मराठा समाजाला EWS प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ; अशोक चव्हाणांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहलं आहे
Congress Ashok Chavan, CM Eknath Shinde
Congress Ashok Chavan, CM Eknath ShindeSaam TV
Published On

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यास तहसीलदार टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी येत असून, राज्य शासनाने जिल्हा व तालुका प्रशासनांना तातडीने निर्देश देऊन मराठा समाजाला ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याबाबत कोणताही न्यायालयीन अडसर नसल्याचे स्पष्ट करावे, अशी मागणी कॉंग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना केली आहे. (Ashok Chavan Latest News)

Congress Ashok Chavan, CM Eknath Shinde
Shivsena| मुख्यमंत्री अन् विरोधी पक्षनेताही शिवसेनेचाच; एकीकडे एकनाथ शिंदे दुसरीकडे दानवे

याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाचे (एसईबीसी) आरक्षण रद्द केल्यानंतर त्याकाळात अपूर्णावस्थेत असलेल्या नोकरभरती प्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाचे (ईडब्ल्यूएस) लाभ देण्याचा निर्णय मागील राज्य सरकारच्या काळात घेण्यात आला होता. मात्र, त्या निर्णयाला उच्च न्यायालयाने रद्दबातल केले आहे. सदरील निर्णय केवळ अपूर्णवस्थेत असलेल्या नोकरभरती प्रक्रियेतील तत्कालीन एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी होता. असं पत्रात मांडण्यात आलं आहे. (Eknath Shinde Latest News)

Congress Ashok Chavan, CM Eknath Shinde
शिंदे गटातील आमदार मातोश्रीच्या संपर्कात? ही असू शकतात कारणं...

याशिवाय त्या निर्णयाचा मराठा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचे लाभ मिळण्याविषयी काहीही संबंध नाही. तरी देखील तहसीलदार मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यास नकार देत आहेत. सध्या अनेक शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया तसेच नोकरभरती प्रक्रियांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने मुख्यमंत्र्यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असेही अशोक चव्हाण यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com