Maharashtra Politics : शिवसेनेनंतर आता कॉंग्रेसचेही आमदार फुटणार?; चर्चांना उधाण

कॉंग्रेसचे तब्बल 15 आमदार भाजपच्या गळाला लागणार असल्याची चर्चा सुरू आहे
Devendra Fadnavis Nana Patole
Devendra Fadnavis Nana PatoleSaam TV
Published On

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप आला. शिंदेंच्या उठावानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. दरम्यान, या धक्क्यातून शिवसेना सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच, दुसरीकडे आता भाजप कॉंग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. कॉंग्रेसचे तब्बल 15 आमदार भाजपच्या गळाला लागणार असल्याची चर्चा सुरू आहे. (Congress Todays News)

Devendra Fadnavis Nana Patole
Navneet Rana : उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही; खासदार नवनीत राणांची जहरी टीका

कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर ही भेट घेतली असल्याची माहिती आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीगाठीवरून चर्चांना उधाण आलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप आला होता. शिंदे यांच्यासह तब्बल 40 आमदारांनी शिवसेनेतून उठाव केल्याने महाविकास आघाडीचं बहुमत कमी झालं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. (Devendra Fadnavis Todays News)

Devendra Fadnavis Nana Patole
Cobra Snake vs Mongoose : मुंगूस आणि कोब्रामध्ये घमासान युद्ध; कोण जिंकलं? पाहा VIDEO

दरम्यान, या धक्क्यातून महाविकास आघाडी सावरत असतानाच, आता कॉंग्रेसचे तब्बल 15 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. कॉंग्रेस आमदार संग्राम थोपटे आणि अस्लम शेख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, मतदार संघातील काही काम प्रलंबित होती. त्यामुळेच आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याची माहिती कॉंग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी साम टिव्हीसोबत बोलताना दिली.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com