Bageshwar Dham: साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणं भोवलं, Dhirendra Krishna Shastri विरोधात मुंबईत तक्रार

Bageshwar Dham: साईबाबांसंदर्भातील वक्तव्याप्रकरणी एकीकडे धीरेंद्र शास्त्रीवर जोरदार टीका होत आहे तर दुसरीकडे त्याच्या अडचणीत वाढ होत चालली आहे.
Dhirendra Krishna Shastri
Dhirendra Krishna ShastriSaam Tv
Published On

Dhirendra Shastri Controversy: महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांविषयी (Shirdi Saibaba) वादग्रस्त वक्तव्य करणं बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र कृष्णा शास्त्रीला (Dhirendra Krishna Shastri) चांगलंच महागात पडलं आहे. या वक्तव्याप्रकरणी एकीकडे धीरेंद्र शास्त्रीवर जोरदार टीका होत आहे तर दुसरीकडे त्याच्या अडचणीत वाढ होत चालली आहे. याप्रकरणी धीरेंद्र शास्त्रीविरोधात मुंबईतील पोलिस (Mumbai Police) ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Dhirendra Krishna Shastri
China Vs India: भारताविरोधात चीनच्या कुरापती वाढल्या; अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावं बदलली

साईंबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी धीरेंद्र शास्त्रीविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेने वांद्रे पोलिस ठाण्यामध्ये यासंदर्भात लेखी तक्रार देण्यात आली आहे. युवासेना नेते आणि शिर्डी साई संस्थानाचे माजी विश्वस्त राहुल कनाल यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

या लेखी तक्रारीमध्ये युवासेना नेते राहुल कनाल यांनी असे लिहिले आहे की, शिर्डीमध्ये असलेल्या साईबाबा भक्तांच्या भावनांशी धीरेंद्र शास्त्री खेळत आहे. धीरेंद्र शास्त्रीविरोधात गुन्हा दाखल करावा आणि त्याच्याविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Dhirendra Krishna Shastri
Koyta Gang Dombivli News: कोयता गँग पॅटर्न डोंबिवलीत? गुंडांचा वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून धुडगूस

दरम्यान, काही दिवसांपूर्वी धीरेंद्र कृष्ण शास्त्रीने साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. साईबाबांची पूजा करावी की करू नये? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना धीरेंद्र शास्त्री म्हणाला की, 'कोल्ह्याची कातडी लावल्याने कोणी सिंह बनत नाही. शंकाराचार्यांनी साईबाबांना इश्वराचे स्थान दिलेले नाही. त्यामुळे त्यांचे हे मत मानणं आमच्यासाठी अनिवार्य आहे. प्रत्येक सनातनी व्यक्तीचे हे कर्तव्य आहे. कारण शंकाराचार्य धर्माचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे साईबाबांना इश्वराचे स्थान देता येणार नाही.

Dhirendra Krishna Shastri
Twitter New Logo : ट्विटरची चिमणी उडाली भुर्रर्र... ट्विटरमध्ये सर्वात मोठा बदल, यूजर्सही झाले अचंबित

तसंच, 'तुलसीदास, सूरदास अशा सर्वच व्यक्ती या देव नाहीत तर महापुरुष आणि संत असतात. मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत मात्र हेच सत्य आहे. साईबाबा हे देव नाहीत. साईबाबाांना आपण संत आणि फकीर म्हणू शकतो. पण ते देव असू शकत नाही.', असे देखील वक्तव्य धीरेंद्र शास्त्रीने केले होते. धीरेंद्र शास्त्रीच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिर्डीतील ग्रामस्थांनी तीव्र निषेध नोंदवला. तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलनं देखील करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com