सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांचं 'एमसीए' मतदारांमध्ये खलबतं; एकनाथ शिंदेंनी लावली क्रिकेटच्या राजकारणात फिल्डिंग

क्रिकेटच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उडी घेतली आहे.
eknath shinde
eknath shinde saam tv
Published On

Eknath Shinde News : मुंबई क्रिकेट असोसिएशन कार्यकारिणीच्या निवडणुकीची सध्या मुंबईत चर्चा आहे. यंदा पहिल्यांदाच आशिष शेलार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात युती झाली. आशिष शेलार यांनी अध्यक्षपदासाठी नामांकन अर्जही भरला आहे. शेलारांच्या विरोधात माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी अध्यक्षपदासाठी नामांकन अर्जही भरला आहे. याच क्रिकेटच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील उडी घेतली आहे.

eknath shinde
धमक्या, आर्थिक प्रलोभने दाखवत शिंदे गटाकडून पदाधिकाऱ्यांना फोडण्याचा प्रयत्न; मनसेचा गंभीर आरोप

क्रिकेटच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील एन्ट्री घेतली आहे. 'एमसीए'च्या निवडणूकपूर्व निवडणूकपूर्व मतदार सदस्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संवाद साधणार आहेत. सह्याद्रीच्या अतिथीगृहावर मुख्यमंत्री 'एमसीए' मतदार यांच्यात बैठक होणार आहे. 'एमसीए'चे मतदार सदस्य सह्याद्री अतिथीगृहावर येण्यास सुरूवात झाली आहे. 'एमसीए'च्या निवडणुकी आधीच पॉलिटिकल हाय हॉल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. 106 मतदार सदस्यांशी मुख्यमंत्री एकनाथ संवाद साधणार आहेत.

eknath shinde
Lumpy Virus : जालन्यात लम्पी आजाराचे थैमान, शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना थेट रक्तानं लिहिलं पत्र

'एमसीए' निवडणुकीसाठी शरद पवार-आशिष शेलारांचे संयुक्त पॅनल

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक २० ऑक्टोबर रोजी होणार आहे. या निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलर हे एकत्रपणे संयुक्त पॅनल घेऊन लढणार आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवाल्या आहेत. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोशिएनची निवडणूक कशी होईल, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत आशिष शेलारांच्या विरोधात निवडणुकीत माजी क्रिकेटर संदीप पाटील लढणार असं बोललं जात आहे. मात्र, संदीप पाटील यांनी सदर निवडणूक लढणार नसल्याचीही चर्चा क्रिकेटच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com