
Eknath Shinde News : देश विघातक कृत्य केल्याच्या संशयावरून केंद्रीय तपास यंत्रणेने पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या देशभरातील कार्यालयावर गुरुवारी धाडसत्र राबवले आहेत. यामध्ये शंभरहून अधिक जणांना एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केली आहे. त्याचे पडसाद पुण्यात उमटले. पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यकर्त्यांनी त्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आक्रमक झाले आहेत.
'शिवरायांच्या भूमीत पाकिस्तानी नारेबाजी अजिबात सहन केली जाणार नाही, अशा कडक शब्दात ट्विट करत मुख्यमंत्री शिंदे यांनी पीएफआयच्या कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेने पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या देशभरातील कार्यालयावर धाडसत्र राबविल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात आंदोलन केले. तसेच पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी नारेबाजी देखील केली. या नारेबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. त्यामुळे सामजिक वातावरण चांगलेच तापलं आहे. त्यानंतर पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमावल्याच्या आरोपावरून पुण्यात (Pune) पीएफआयच्या (PFI) 60 ते 70 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
पीएफआयच्या पाकिस्तानी नारेबाजीविरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील चांगले आक्रमक झालेले पाहायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत पीएफआयच्या कार्यकर्त्यांना कडक इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,'पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.