पिंपरी चिंचवड : 'आयर्न मॅन' अशी ओळख असलेले पिंपरी-चिंचवडचे (Pimpri-Chinchwad) पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांची बेकायेशीररित्या झालेली बदली तात्काळ थांबवण्यात यावी, या मागणीसाठी पिंपरी चिंचवडकरानी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ एका मोठ्या बोर्डवर स्वाक्षऱ्या करून पिंपरी चिंचवडकरांनी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश (Krishna Prakash) यांच्या झालेल्या बदलीला (Transfer) आपला विरोध दर्शविला आहे.
हे देखील पहा :
कृष्णप्रकाश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त असताना शहरातील गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणात आळा बसला होता. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील सर्व अवैध धंदे जवळपास बंद होते. त्यामुळे पिंपरी चिंचवडकर शहरात स्वतःला सुरक्षित समजायचे. मात्र, शहरातील काही राजकीय पुढाऱ्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता महाविकास आघाडी (MVA Government) सरकारवर दबाव टाकून पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची बदली केल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केला आहे. राज्य सरकारने पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची बेकायदेशीररित्या झालेली बदली तात्काळ थांबवावी अशी मागणी जोर धरत आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.