CIDCO Corporation
CIDCO Corporationसिद्धेश म्हात्रे

सिडकोने रचला बांधकाम क्षेत्रात इतिहास; १२ मजली इमारत बांधली चक्क 'एवढ्या' दिवसात

प्रधानमंत्री आवास योजनेतील 'सर्वांसाठी घरे' हे उद्दिष्ट जलद गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने गृहनिर्माण क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे.
Published on

सिद्धेश म्हात्रे -

मुंबई: सिडको महामंडळाने (CIDCO Corporation) जगप्रसिद्ध प्रीकास्ट या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून तब्बल ९६ सदनिका असणाऱ्या १२ मजली निवासी इमारतीचे बांधकाम केवळ ९६ दिवसांत पूर्ण केलेय. याद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेतील 'सर्वांसाठी घरे' हे उद्दिष्ट जलद गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने गृहनिर्माण क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे. (Housing for All)

सिडकोने (CIDCO) ‘मिशन 96’ अंतर्गत कमीत कमी वेळात बांधकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठरवले होते. त्यानुसार एल अँड टी कंपनीद्वारे (L&T Company) उलवा बामण डोंगरी येथे बांधकाम वेगाने पूर्ण करण्यासह सुरक्षित आणि मजबूत घरे बांधण्याकरिता प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा (Precast Technology) वापर केला आहे.

पाहा व्हिडीओ -

प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करून ९६ सदनिका असणाऱ्या १२ मजली निवासी इमारतीचे बांधकाम केवळ ९६ दिवसांत पूर्ण करण्यात आलं आहे. ४ एप्रिल २०२२ रोजी सुरू झालेले या १२ मजली इमारतीचे बांधकाम ९ जुलै २०२२ रोजी पूर्ण करण्यात आलं आहे.

CIDCO Corporation
Maharashtra Cabinet Expansion: भाजपच्या या '४' आमदारांना मंत्रिपद फिक्स

बांधकाम तंत्रज्ञानाव्यतिरिक्त बांधकामाच्या प्रगतीवर देखरेख करण्यासाठी डिजिटल (Digital) तंत्रज्ञानाचाही वापर यामध्ये करण्यात आला आहे. यावेळी प्रिकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील सर्वात जलद इमारत बांधली असल्याची प्रतिक्रिया सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी दिली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com