Chinchwad Election: चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला धक्का! पराभवानंतर नाना काटेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; 'बंडखोरीचा फटका...'

भाजपा उमेदवार अश्विनी जगताप यांनी ३६ हजार ९१ मतांनी नाना काटे यांचा पराभव केला आहे.
Nana Kate, Chinchwad By Election NCP
Nana Kate, Chinchwad By Election NCPSaamtv
Published On

Chinchwad Bypoll Election Result: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या चिंचवड पोट निवडणूकीचा अंतिम निकाल अखेर हाती आला. ज्यामध्ये महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) मोठा धक्का बसला असून भाजपा उमेदवार अश्विनी जगताप यांनी ३६ हजार ९१ मतांनी नाना काटे यांचा पराभव केला आहे.

या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नाना काटे यांच्यासाठी राष्ट्रवादीची (NCP) फौज चिंचवडमध्ये तळ ठोकून होती. विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी पुण्यात ठाण मांडलं होतं. मात्र अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा फटका महाविकास आघाडीला बसला आहे. या पराभवानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Nana Kate, Chinchwad By Election NCP
Chinchwad Election Result: चिंचवडचा गड 'भाजप'कडे, अश्विनी जगताप यांचा मोठा विजय; राष्ट्रवादीला धक्का

काय म्हणाले नाना काटे...

सगळे कार्यकर्ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचले. पण बंडखोरीचा फटका नक्कीच बसला आहे. कारण कलाटेंना झालेलं मतदानही महाविकास आघाडीचेच आहे. त्यातली काही मतं वंचित बहुजन आघाडीची असू शकतील, असे म्हणत सर्व कार्यकर्ते संपूर्ण चिंचवड मतदारसंघात पुन्हा काम करतील आणि आम्ही जोमानं काम करू, अशी प्रतिक्रिया नाना काटे यांनी दिली आहे.

त्याचबरोबर पुढे बोलताना "निवडणूकीत पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. सर्व कार्यकर्ते संपूर्ण चिंचवड मतदारसंघात पुन्हा काम करतील आणि आम्ही जोमानं काम करू. सहानुभूती असती तर पैसे वाटलेच नसते. त्यांना पराभवाची भीती होती म्हणून त्यांनी पैसे वाटले, असा आरोपही काटेंनी यावेळी केला.

Nana Kate, Chinchwad By Election NCP
Kasba Peth Election: बालेकिल्यात भाजपला दे धक्का! प्रतिभा धंगेकरांची भावूक प्रतिक्रिया, म्हणाल्या; 'शरद पवारांचा आशिर्वाद...

कोणाला किती मते...

चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच अश्विनी जगताप यांनी आघाडी मिळवण्यास सुरुवात केली होती. तिरंगी लढतीचा फायदा अश्विनी जगताप यांना झाल्याचे दिसून आले. मतमोजणीच्या 37 व्या फेरीनंतर अश्विनी जगताप यांना 1 लाख 35 हजार 434 मते मिळाली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार नाना काटे यांना 99 हजार 343 मते मिळाली. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 44 हजार 082 मते मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com