Thane News : सानुग्रह अनुदान देण्यास ठाणे महापालिकेचा नकार, कर्मचा-यांचे काम बंद आंदाेलन सुरु

सानुग्रह अनुदान देण्यास नकार दिल्याने कर्मचा-यांनी काम बंद आंदाेलन छेडले आहे.
thane
thanesaam tv

Thane News : कोवीड काळात घेण्यात आलेल्या कर्मचा-यांनी आता ऐन दिवाळीच्या (diwali 2023) सुमारास संपाची हाक दिली आहे. आज सुमारे ४४५ कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पगारवाढ आणि सानुग्रह अनुदान मिळावे या मागणीसाठी ही संपाची हाक देण्यात आल्याची माहिती संपात सहभागी होणा-या कर्मचा-यांनी दिली. त्यातही महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात यातील १७५ कर्मचारी आहेत. त्यांनी आज पालिके समोर मागणीसाठी आंदोलन केले. (Maharashtra News)

thane
Anganwadi Sevika Andolan : दिवाळीपूर्वी भाऊबीज द्या; नंदुरबार जिल्हा परिषेदवर अंगणवाडी सेविकांचा ठिय्या

ठाणे महापालिकेच्या मार्फत कोवीड काळात रुग्णालय व इतर ठिकाणी खाजगी स्वरुपात कंत्राटी कर्मचारी घेण्यात आले होते. त्यांना वारंवार कामाच्या ठिकाणी तीन ते सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जात आहे. सध्या देखील यातील ४४५ कर्मचारी कामावर रुजू आहेत. परंतु त्यांच्या पगारात अद्यापही वाढ झाली नसल्याचा आरोप कर्मचा-यांनी केला आहे.

याशिवाय पालिकेतील इतर कर्मचा-यांना कंत्राटी स्वरुपातील कर्मचा-यांना देखील सानुग्रह अनुदान देण्याचे मान्य झाले आहे. मात्र आम्ही कोवीड काळात आणि आता जीवावर उदार होऊन काम करीत असतानाही आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे कर्मचा-यांचे म्हणणे आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यातही रुग्णालयात काम करीत असतांना या कर्मचा-यांचा रुग्णांशी थेट संपर्क येत असल्याने कर्मचारी आजारी पडत आहेत. परंतु त्यांना भर पगारी रजा दिली जात नाही. त्यामुळे किमान दिवाळी गोड व्हावी अशी माफक अपेक्षा या कर्मचा-यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान पालिकेने सानुग्रह अनुदान देण्यास नकार दिल्याने कर्मचा-यांनी काम बंद आंदाेलन छेडले आहे.

Edited By : Siddharth Latkar

thane
Prashant Damle : राजकारणी हेच उत्तम कलाकार; प्रशांत दामलेंचा मिश्किल टाेला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com