विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकार 4 मंत्री पाठवणार; "ही तत्परता आधी का नाही दाखवली, नुसता इव्हेन्ट"

केंद्र सरकारचे चार मंत्री युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारचे चार मंत्री जात आल्याचे सांगण्यात आले होते. या मुद्द्यावरून आज मंत्री छगन भुजबळ यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSaam Tv
Published On

रश्मी पुराणिक

मुंबई: रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभुमीवर युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशात आणण्याच्या मुद्द्यावर काल मोदींनी दोनदा उच्चस्तरीय घेतली. यात केंद्र सरकारचे चार मंत्री युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारचे (Central Government) चार मंत्री जात आल्याचे सांगण्यात आले होते. या मुद्द्यावरून आज मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी भुजबळ म्हणाले, तिकडे लढाई सुरू झाली तरी इकडे मीटिंग सुरू होत्या. ह्यात जी तत्परता दाखवायला हवी होती ती दाखवली नाही. आता चार मंत्री पाठवून इव्हेंट करत आहेत. जणू हेच सगळ करतात. विद्यार्थ्यांची चिंता वाटते तर त्याचा इव्हेंट का करता? असा सवालही भुजबळ यांनी केल आहे. आज जे करत आहेत ते पंधरा दिवसांपूर्वीच करायला हवा होता, असा टोला त्यांनी लगावला आहे.

Chhagan Bhujbal
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्या मुलाचे वयाच्या 26 व्या वर्षी निधन !

निकाल आमच्या बाजूनेच लागणार;

उद्या OBC आरक्षणावर सुनावणी होणार आहे त्याबद्दल छगन भुजबळ म्हणाले, आम्ही पण वाट बघत आहोत. कालच वाटल होत आमच्या बाजूने निकाल लागेल. दोन्ही विषय बुधवारी घेणार आहे. अपेक्षा आहे की, हा निकाल आमच्या बाजूने लागेल. ओबीसी आरक्षण थांबवण्याचे कारण त्रिपल टेस्ट कारण सांगितले आहे, यासाठी आवश्यक असणारे सर्व काम पूर्ण झाले आहे अशीही माहिती त्यांनी दिली.

हे देखील पहा-

तसेच, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकार 'ऑपरेशन गंगा' राबवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या २४ तासांत दोनदा उच्चस्तरीय बैठका घेऊन रणनीती आखली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांची देखील भेट घेतली आणि त्यांना युक्रेन संकटासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com