मुंबईत पावसाने घेतले 15 जणांचे बळी; मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता

चेंबूरच्या आरसीएफ भारत नगर येथे दरड कोसळून घर कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतची माहिती दिली आहे.
मुंबईत पावसाने घेतले 15 जणांचे बळी; बचावकार्य सुरु
मुंबईत पावसाने घेतले 15 जणांचे बळी; बचावकार्य सुरुSaam Tv
Published On

शनिवारी रात्री मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस झाला आहे . रात्रभर पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे संपुर्ण भागात पाणी साचले होते. रात्रभर झालेल्या पावसामुळे मुंबई दोन ठिकाणी 15 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. विक्रोळी येथे तीन जणांचा तर चेंबूरमध्ये 12 जणांचा घराचा छत कोसळून मृत्यू झाला आहे.

चेंबूरच्या आरसीएफ भारत नगर येथे दरड कोसळून घर कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, विक्रोळी मधिल डोंगरळ भाग असलेल्या पंचशीलनगरमध्ये घराचे छत पडून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डोंगराळ वस्तीमध्ये एका घरावर दुसरे असे तीन-चार घरे एकमेंकावर पडली आहेत. तर आठ ते दहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. NDRF चे पथक घटनास्थळी सकाळीच दाखल झाले असून बचावकार्य वेगात सुरु आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, मृताचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. भांडूपमध्ये एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

मुंबईसह इतर ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसाने रेल्वेचं वेळापञक डगमगलं आहे. मध्य आणि हार्बर मार्गावर अनेक स्थानकांवर रेल्वे रुळ जलमय झाले आहेत. ठाणे /कल्याण, कर्जत/ खोपोली, कसारा सेक्शन, वाशी / पनवेल, ट्रान्स हार्बर लाइन, नेरूळ/बेलापूर, खारकोपर लाइन वरील गाड्या कार्यरत, तर एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापञकात बदल करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. त्याचबरोबर राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊ सुरु आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com