Dombivli : डोंबिवलीकरासाठी मोठी बातमी; दोन मोठ्या रस्त्याचे काम होत असल्याने वाहतूकीत बदल...

कल्याण - शीळ रोडवर गर्डर टाकण्याच्या कामानिमित्त वाहतूकीत बदल...
Dombivli News
Dombivli NewsSaam Tv

डोंबिवली - वाहतूक विभागाच्या कोळसेवाडी वाहतूक उपविभागाच्या हद्दीमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई (Mumbai)अंतर्गत कल्याण-शीळ रोडवरील लोढा पलावा जंक्शन येथील देसाई खाडीवर नवीन पूल निर्माण करण्याचे काम चालू असून नवीन पुलाचे काम करण्यासाठी कल्याण फाटा कडून कल्याणकडे जाणाऱ्या वाहिनीवर मोठे क्रेन ठेवून सिमेंट गर्डर ठेवण्याचे काम करावयाचे आहे.

Dombivli News
Jalna : दानवेंच्या गावात 30 वर्षानंतर निवडणूक; दानवेंची प्रतिष्ठा पणाला

त्यासाठी 15 डिसेंबर 2022 ते 22 डिसेंबर 2022 रोजी पर्यंत रात्री 11.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत सदर पुलावरील वाहिनी वाहतूकीकरीता बंद करण्यात आल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.दरम्यान मानपाडा रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामानिमित्त वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.

वाहतूकीतील बदल पुढील प्रमाणे

प्रवेश बंद - कल्याण फाटाकडून कल्याण कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना कल्याण फाटा येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग - कल्याण फाटा कडून कल्याण कडे जाणारी सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहने ही कल्याण फाटा-मुंब्रा बायपास मार्गे खारेगाव टोलनाका मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद - कल्याण कडून कल्याण फाटा कड़े जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड - अवजड वाहनांना बदलापूर चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

Dombivli News
Crime News : खून करुन अपघाताचा रचला बनाव, विम्याचे चार कोटी रुपये लाटले; महिलेसह पाच अटकेत

 पर्यायी मार्ग - कल्याण कडून कल्याण फाटा कडे जाणारी सर्व प्रकारच्या जड अवजड वाहने ही बदलापूर चौक- खोणी नाका-तळोजा एमआयडीसी मार्गे इच्छित स्थळी जातील.

दरम्यान मानपाडा रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामानिमित्त वाहतूकीत बदल करण्यात आला आहे.डोंबिवली पूर्व साईबाबा सागाव चौक ते मानपाडा चौक दरम्यान रस्त्याचे खोदकाम करून कॉक्रिटीकरण करण्यात येणार आहे. सदर भागात वाहतूक सुरळीत व सुनिश्चित होण्याकरीता वाहतूकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com