PM Modi Security Lapse: मोदींच्या सुरक्षेवरुन चंद्रकांत पाटील पंजाब सरकारवर बरसले

भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंजाबमधील PM Modi यांच्या सुरक्षेतील त्रुटीबाबत तीव्र आक्षेप नोंदवत पंजाब सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.
Security lapse hits PM Modi’s Ferozepur visit
Security lapse hits PM Modi’s Ferozepur visitSaam Tv
Published On

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: पंजाबच्या फिरोजपुरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होती. मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सुरक्षेच्या कारणात्सव पंतप्रधानांना सभास्थळी पोहोचता न आल्याने सभा रद्द करावी लागली. इतकचं नाही तर पंतप्रधानांचा ताफा (Prime Minister's contingent) १५ ते २० मिनिटे रस्त्यावर थांबवावा लागला होता. या सगळ्या प्रकाराबाबत भाजपकडून तीव्र शब्दांत प्रतिक्रिया उमटत आहे. भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी या प्रकाराबाबत तीव्र आक्षेप नोंदवत निषेध व्यक्त केला आहे.

हे देखील पहा -

चंद्रकांत पाटील यांनी 'देशाचे पंतप्रधान (PM Modi) यांच्या सुरक्षेची पंजाब (Punjab) सरकारने काळजी घ्यायला हवी की नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. रोडचा क्लियरन्स कोणी दिला होता? असं म्हणत देशाच्या पंतप्रधान यांच्याशी तुम्ही खेळ खेळता हे योग्य नाही, पंजाब सरकारने ही काळजी घेतली जायला हवी होती असा टोला लगावला आहे. त्याचप्रमाणे तुम्ही त्या रोडला सामान्य लोकांना प्रवेश देत आहात हे योग्य नाही, हे सर्व चौकशीत समोर येईल असंही ते म्हणाले.

पाटील पुढे म्हणाले की, केंद्र आणि राज्य यांचे सलोख्याचे संबंध असायला हवे असा सल्ला देत ते म्हणाले की यांना (विरोधकांना) या देशात अराजकता माजवायची आहे. याची चौकशी लागेल, ही जर पंजाब सरकारची चूक आहे हे समोर आले तर पंजाब सरकार मान्य करणार आहे का? असा सवाल त्यांनी विचारला.

Security lapse hits PM Modi’s Ferozepur visit
पंतप्रधानांच्या सुरक्षेत मोठी चूक, आंदोलकांनी अडवला रस्ता; मोदींचा 'यू-टर्न'

राज्याच्या राजकारणाबाबत पाटील म्हणाले की, राज्यपालांबाबत देखील आपण बघतो पत्रात कशी भाषा वापरली जाते. हा स्वातत्र्यांवर घाला घातला जात आहे असा आरोप त्यांनी केला. चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना म्हणाले की, तुमचे कार्यकर्ते झोपा काढत आहेत, त्यांना तुम्ही सांगत आहात कामाला लागा. भाजप कोर्टाची लढाई लढत आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय आम्ही निवडनुक होऊ देणार नाही आणि जर निवडणूक लागली तर आम्ही सर्व जागांवर ओबीसी उमेदवार देऊ असंही पाटील म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com