"मविआ सरकार झुकती है..." वीजतोडणी थांबवल्याने चंद्रकांत पाटलांचे खोचक ट्विट

अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपने सुरुवातीपासूनच राज्यातील शेतकऱ्यांच्या वीज तोडणी मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली.
Chandrakant Patil Tweet
Chandrakant Patil Tweet saam Tv
Published On

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपने सुरुवातीपासूनच राज्यातील शेतकऱ्यांच्या वीज तोडणी मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील या मुद्द्यांवरून सरकारला लक्ष्य केले. तर ठिकठिकाणी शेतकरी देखील आंदोलन करत असल्याने अखेर महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) आज अधिवेशनात वीज तोडणी संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार, शेतकऱ्यांच्या वीज तोडणीची कारवाई ही तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात येत आहे, अशी घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केली. या निर्णयाचे विरोधी पक्षाकडून स्वागत करण्यात आले. तर या निर्णयावरून भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज्य सरकारला एक खोचक टोला लगावला आहे.

Chandrakant Patil Tweet
रायगड: ST चालकाला मारहाण पडली महागात; न्यायालयाने सुनावली सक्तमजुरी !

चंद्रकांत पाटलांच्या ट्विटमध्ये काय ?

"मविआ सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून भाजपाने लावून धरलेल्या शेतकऱ्यांच्या वीजतोडणी संदर्भात अखेर मविआ सरकारला नमावेच लागले वीजतोडणी तात्काळ थांबवण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आदेश गोरगरीब शेतकऱ्यांसोबत भाजपा सदैव खंभीरपणे उभी आहे #BJP " असे चंद्रकांत पाटील यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे.

तसेच, “आम्ही तुमचे अभिनंदन करतो. आपण घेतलेला निर्णय हा अधिवेशन संपल्यानंतरही कायम रहावा एवढीच इच्छा,” असा टोला माजी अर्थमंत्री तथा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना लगावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com