राज्यातील घटनांशी भाजपचा काहीही संबंध नाही; चंद्रकांत पाटील काय म्हणाले? वाचा...

मला सर्व बातम्या चॅनलवरूनच कळतात असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
Chandrakant Patil
Chandrakant Patil Saam Tv
Published On

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या काही आमदारांना बंड केल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. एकीकडे शिंदे गट भाजपसोबत जात सत्ता स्थापन करणार अशी चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक महत्वपूर्ण विधान केलं आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचा चाललेल्या घटनांमध्ये कोणताही संबध नाही, मला सर्व बातम्या चॅनलवरूनच कळतात असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. (BJP Maharastra Latest News)

Chandrakant Patil
एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना पश्चाताप होईल : संजय राऊत

शरद पवार यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्यांमध्ये भाजपचा हात आहे असं म्हटलं होतं. त्यावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे. या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. ते शरद पवार साहेबांना आणि संजय राऊतांना जरा जास्तच आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये काहीही म्हणता येतं असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. याशिवाय देवेंद्र फडणवीस यांचं दिल्लीत जाणं हे रुटीन आहे, दिल्लीत ते नेहमी चर्चा करण्यासाठी जातात. असंही ते म्हणाले.

नारायण राणे यांनी जाहीर केलेल्या भूमिकेशी आमचा कोणताही संबध नाही, भाजपची भूमिका पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी मांडत असतो. मात्र, आमच्या नेत्यांना उत्तरं देण्याचे अधिकार आहे. असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. सगळ्या विषयांशी मी अनभिज्ञ आहे, की गेलेत कोण आणि आलेत कोण हे मला माहिती नाही, असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांच्या विधानावर बोलणं टाळलं आहे. (Eknath Shinde Latest News)

Chandrakant Patil
"भाई मातोश्रीवर परत चला!" साताऱ्याचा शिवसैनिक पोहोचला थेट शिंदे थांबलेल्या हॉटेलबाहेर

शिवसेनेच्या आमदारांसोबत भाजपचे आमदार का आहे? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला. आमचे आमदार शिवसेनेच्या आमदारांचे मित्र आहेत. मोहित कंबोज यांचे सर्व पक्षांमध्ये मित्र आहेत. त्यामुळे ते एकनाथ शिंदे यांना सहज भेटायला गेले असेल. असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.

दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनानंतरही शिवसेनेच्या अडचणी वाढत आहेत. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. तर शिवसेनेच्या आमदारांची संख्या मात्र कमी होत आहे. आपल्याला 50 पेक्षा अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीनंतरच पुढील रणनिती ठरणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com