सुशांत सावंत -
मुंबई : महाराष्ट्रातील ओबीसींच राजकीय आरक्षण (OBC Reservation) रद्द झाल्यामुळे भाजपने महाविकास आघाडी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात मध्य प्रदेश सरकारने आपलं OBC आरक्षण कायम ठेवलं आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात पुन्हा ओबीसींना राजकीय आरक्षण मिळू शकतं मग महाराष्ट्राला का नाही? असा सवाल उपस्थित करत, राज्य सरकारच्या वेळखाऊपणामुळेच ओबीसी आरक्षण गेल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज भाजपकडून, भाजपा मुंबई कार्यालय (BJP Mumbai Office) ते मंत्रालय असा धडक मोर्चा काढला आहे. (Chandrakant Patil News)
या धडक मोर्चा दरम्यान बोलत असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. पाटील म्हणाले, 'माझा दावा आहे, या व्यासपीठावर येऊन उद्धव ठाकरे यांनी इंम्पेरिकल डाटा काय आहे ते सांगावं? ट्रिपल टेस्ट काय असते ते सांगावं.' असं आव्हानच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं.
हे देखील पाहा -
शिवाय आरक्षणासाठी वेळ मिळाला म्हणून तुम्ही अधिकार घेतलेत. तुम्हाला पाच वर्षाची पूर्ण टर्म ओबीसी राजकीय आरक्षणा शिवाय घ्यायच्या आहे. भाजप सर्व निवडणूकामध्ये २७ टक्के ओबीसींना स्थान देणार अशून तसे आदेश आम्ही सर्व जिल्हाध्यक्षाना दिले आहेत आणि या सरकारची दानत खरी असेल तर शिवसेनेने देखील घोषणा करावी असं देखील ते यावेळी म्हणाले. तसंच ही पाच वर्षे ओबीसीना राजकीय आरक्षण मिळणार नसल्याचं भाकीत देखील त्यांनी यावेळी केलं.
तसंच पटोले आणि भुजबळ फसवणूक करत आहेत. हे ओबीसी समाजाचे मारेकरी आहेत. यांना फक्त खुर्चीची भाषा कळते. संघर्ष सुरू ठेवू पण यांना उघडं पाडू, कायदा हाताशी होता पण यांनी काम केले नाही, यांचा इतिहास लोकांना उल्लू बनवणे आहे. असं देखील पाटील म्हणाले. या धडक मोर्चा दरम्यान पोलिसांनी चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.