
पुणे : शैक्षणिक वर्ष २०२१- २२ च्या इयत्ता ११ वी प्रवेशाकरिता घेण्यात येणारी सामाईक प्रवेश Login परीक्षा राज्य मंडळाकडे State Board नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना आज दुपारी तीन वाजल्यापासून ऑनलाईन Online अर्ज भरता येणार आहे. तर अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना Students बुधवारपासून अर्ज करता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र Maharashtra राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी यावेळी दिली आहे.
कनिष्ठ महाविद्यालयामधील ११ वी प्रवेशाकरिता होणारी ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे ऐच्छिक राहणार आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन स्वरूपाची राहणार आहे. राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित राहणार आहे. विद्यार्थ्यांना "https://cet.11thadmission.org.in'’ या संकेतस्थळावर आजपासून अर्ज करता येणार आहेत. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी २ ऑगस्टपर्यंत ही सुविधा उपलब्ध राहणार आहे.
हे देखील पहा-
राज्य मंडळाने रविवारी सायंकाळी उशिरा याबाबत परिपत्रक काढले आहे. राज्य मंडळाने या अगोदर २० जुलै दिवशी ११ वी सीईटी परीक्षेचा अर्ज भरण्याकरिता सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, तांत्रिक बिघाडीमुळे २१ जुलै दिवशी ही अर्ज नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात केली होती. यानंतर ५ दिवसांनी अर्ज नोंदणीकरिता नवीन यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. यानुसार राज्य मंडळाने जाहीर करण्यात आले आहे.
नव्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहे. या अगोदर २० आणि २१ जुलै दिवशीच्या दरम्यान परीक्षेकरिता नोंदणी अर्ज करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज क्रमांक आणि नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून या संकेस्थळावर अर्ज बघता येणार आहे. यावेळी अर्ज पूर्णपणे दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना परत नव्याने अर्ज करण्याची गरज नाही.
मात्र, या अगोदर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज भरावा लागणार आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून या परीक्षेचे शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र, अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेण्यात येणार आहे. यासाठी पेमेंट गेटवेची सुविधा देखील उपलब्ध करून दिले आहे. यामूळे अशा विद्यार्थ्यांना बुधवारपासून परीक्षेकरिता अर्ज करता येणार आहे, असे डॉ. भोसले यांनी यावेळी सांगितले आहे.
परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका राहणार आहे. त्याकरिता २ तासांचा कालावधी राहणार आहे. परीक्षेची प्रश्नपत्रिका ८ माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सेमी इंग्रजी या माध्यमाची निवड केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांत अर्जात निश्चित केलेल्या इंग्रजी आणि इतर माध्यमाचा विचार करून प्रश्नपत्रिका पुरविण्यात येणार आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.