Mumbai Mega Block : रविवारी लोकलचं वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा, रेल्वेच्या मार्गांवर मेगा ब्लॉक; कधी, कुठे आणि किती वाजता?

Mumbai Mega Block News : मुंबईतील उपनगरीय विभागांमधील रेल्वेची अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी २५ मे म्हणजेच रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे. यासंबंधित माहिती रेल्वे प्रशासनाने जाहीर केली आहे.
mumbai mega block
mumbai mega blockSaam Tv
Published On

Mumbai Mega Block : मध्य रेल्वे मुंबई विभागाद्वारे रविवारी २५ मे २०२५ रोजी मुंबईतील उपनगरीय विभागांत विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक असणार आहे. मेगा ब्लॉकबाबतची माहिती आणि वेळापत्रक रेल्वे प्रशासनाने प्रसिद्ध केले आहे.

माटुंगा -मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

mumbai mega block
Vaishnavi Hagawane : मोठी बातमी, वैष्णवीच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी सासऱ्यांची मटण बिर्याणी पार्टी, CCTV मध्ये घटना कैद

ठाणे येथून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि मुलुंड व माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील आणि नंतर माटुंगा स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सुटणाऱ्या/येणाऱ्या सर्व अप आणि डाऊन लोकल आपल्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

mumbai mega block
Shocking : वैष्णवीनंतर पुन्हा संतापजनक प्रकार, हुंड्यामुळे सोलापुरात विवाहितेला मारहाण, विष पाजण्याचा प्रयत्न; महाराष्ट्र पुन्हा हादरला

ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत

ब्लॉक काळात वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन लाईन सेवा आणि

पनवेल/नेरुळ/वाशी येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत ठाणेसाठी सुटणाऱ्या अप लाईन सेवा रद्द राहतील.

mumbai mega block
Accident News : वाहनाचा दोर तुटला अन् अनर्थ घडला; डीजे जनरेटरची दुचाकीला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com