Railway: मध्य रेल्वे भंगार विकून मालामाल, कोट्यावधी रुपयांचा महसूल जमा

मागील आर्थिक वर्षात म्हणजेच २०२०-२१ या वर्षात ३५० कोटी रुपयांचा भंगार विक्रीचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं.
Railway
RailwaySaam TV
Published On

मुंबई : मध्य रेल्वेने (Central Railway) 'शून्य भंगार मोहीम' हाती घेतली असून या मोहिमे अंतर्गत मध्य रेल्वेचे सगळे विभाग भंगार साहित्यापासून मुक्त करण्याचा रेल्वेप्रशासनाचा मानस आहे . या उपक्रमामुळे शेकडो कोटींचा महसूल देखील मध्य रेल्वेच्या तिजोरीत जमा झाला आहे.

या मोहिमे अंतर्गत २०२१-२२ या आर्थिक वर्षात (In The Financial Year) २३ मार्च २०२२ पर्यंत भंगारातून ५०५ कोटी ८५ लाख रुपये इतकं महसूल रेल्वेने मिळवलंय . या वर्षभरात ४०० कोटी रुपयांचं भंगार विक्रीचं लक्ष मध्य रेल्वेने ठेवलं होतं . पण सध्या मिळालेलं महसूल ठेवलेल्या लक्षपेक्षा २६.४६ टक्के अधिक आहे . 'शून्य भंगार मोहीम' अंतर्गत या भंगार साहित्यात खराब झालेले रुळ, पर्मनंट-वे साहित्य, निरुपयोगी डबे, वॅगन आणि इंजीन इत्यादींचा समावेश आहे .

Railway
मित्राशी बोलत असताना युवकाच्या डोक्यात मार्बल पडल्याने दुर्दैवी मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद

मागच्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२०-२१ या वर्षात ३५० कोटी रुपयांचा भंगार विक्रीचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं, पण त्याहून अधिक तब्बल ३९१ कोटी ४३ लाख रुपयांचे भंगार मध्य रेल्वेने विक्री केलं होतं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com