Mumbai Mega Block on Sunday : रविवारी प्रवासाचे नियोजन करताय? त्याआधी जाणून घ्या लोकल मार्गावरील मेगाब्लॉकची माहिती

Central Railway and harbour line Mega Block on sunday : मुंबईत रविवारी देखभालीचे काम करण्यासाठी मध्य रेल्वेकडून उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक घोषणा करण्यात आली आहे.
Central Railway and harbour line Mega Block on sunday
Central Railway and harbour line Mega Block on sundaySaam Tv

Mumbai News : रविवारी सुटीचा दिवस असल्याने अनेक जणांचे प्रवासाचे नियोजन असते. अनेक जण या सुटीनिमित्त फिरण्यासाठी किंवा नातेवाईकांकडे जाण्याचे नियोजन करत असतात. मात्र, याच दिवशी मुंबईत रविवारी देखभालीचे काम करण्यासाठी मध्य रेल्वेकडून उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक घोषणा करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

मुंबईत (Mumbai) रविवारी ठाणे-कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत मेगाब्लॉक घोषित करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.३० ते दुपारी २.४५ या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. सुटणाऱ्या डाउन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

Central Railway and harbour line Mega Block on sunday
Maruti Suzuki Price Hike: मारुती सुझुकीचा ग्राहकांना झटका ! एप्रिलपासून वाढणार किंमती, जाणून घ्या

या गाड्या त्यांच्या शेड्यूल थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील.या गाड्या त्यांच्या वेळापत्रकाच्या थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

हार्बर मार्गावर कसा असेल मेगाब्लॉक ?

कुर्ला- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ या वेळेत हार्बरमार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. या मार्गावर पनवेल/बेलापूर/वाशी करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

Central Railway and harbour line Mega Block on sunday
Mumbai Crime News : ईडीची मोठी कारवाई; ED कार्यालयात काम करणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांना अटक, काय आहे प्रकरण?

तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कुर्ला आणि वाशी - पनवेल स्थानकांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com