ठाकरे सरकारला धारेवर धरणाऱ्या किरीट सोमय्यांना केंद्राने दिली 'Z' दर्जाची सुरक्षा

मुख्यमंत्र्यासह ठाकरे सरकारमधील मोठ्या नेत्यांना धारेवर धरणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना केंद्र सरकारने झेड दर्जाची सुरक्षा बहाल केली आहे. या सुरक्षा कवचामध्ये CISF चे ४० जवान असेल.
ठाकरे सरकारला धारेवर धरणाऱ्या किरीट सोमय्यांना केंद्राने दिली 'Z' दर्जाची सुरक्षा
ठाकरे सरकारला धारेवर धरणाऱ्या किरीट सोमय्यांना केंद्राने दिली 'Z' दर्जाची सुरक्षाSaam Tv News
Published On

मुंबई: मुख्यमंत्र्यासह ठाकरे सरकारमधील मोठ्या नेत्यांना धारेवर धरणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना केंद्र सरकारने झेड दर्जाची सुरक्षा बहाल केली आहे. ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून किरीट सोमय्या सरकारवर सतत टीका करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून तर ते फारच आक्रमकपणे ठाकरे सरकारवर अनेक आरोप करत आहेत. त्यामुळे त्यांना धमक्या येत असल्याने त्यांनी केंद्र सरकारकडे अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली होती, जी तात्काळ मान्य करत त्यांना झेड दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. या सुरक्षा कवचामध्ये CISF चे ४० जवान असेल. (The Central government has given 'Z' grade security to Kirit Somaiya, who is slams the Thackeray government)

हे देखील पहा -

किरीट सोमय्या हे सध्या ठाकरे सरकारवर जणू काही तुटुन पडले आहेत. मुख्यमंत्र्यापासून ते ठाकरे सरकारमधील अनेक बड्या नेत्यांवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. यात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, अनिल परब यांचे विश्वस्त मानले जाणारे परिवहन अधिकारी बजरंग खारमोटे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांसारख्या ११ बड्या नेत्यांचा समावेश आहे.

सोमय्यांच्या हे थेट परिवहन अधिकारी बजरंग खारमोटे यांच्या बंगल्याची पाहणी करायला गेले होते. तसेच तो आलिशान बंगला अनिल परबांचा असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यामुळे सध्या सोमय्या विरुद्ध ठाकरे सरकार असं राजकीय वातावरण तापलं आहे.

ठाकरे सरकारला धारेवर धरणाऱ्या किरीट सोमय्यांना केंद्राने दिली 'Z' दर्जाची सुरक्षा
Breaking! ह्रदय शस्त्रक्रियेसाठी वाझेकडून रुग्णालय बदलण्यासाठी अर्ज दाखल

किरीट सोमय्या यांना आधी वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. वाय सुरक्षेत १५ पोलीस तैनात होते. वाशीम दौऱ्यामध्ये किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाला होता, त्यानंतर केंद्रीय गृहखात्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com