Parambir Singh: परमबीर सिंग यांच्याशी सबंधित ५ प्रकरणांचा तपास सीबीआय करणार

वसुली प्रकरणात अडचणीत आलेले मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याशी संबंधित पाच प्रकरणांचा तपास आता सीबीआय करणार आहे.
Parambir Singh
Parambir Singh Saam T
Published On

मुंबई: वसुली प्रकरणात अडचणीत आलेले मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्याशी संबंधित पाच प्रकरणांचा तपास आता सीबीआय करणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर केंद्रीय यंत्रणेच्या विशेष गुन्हे शाखेने मंगळवारी संध्याकाळी परमबीर सिंह यांच्याविरोधात गुन्ह्यांची नोंद केली होती.

CBI ने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस दलातील कथित गैरवर्तन आणि भ्रष्टाचाराच्या ५ प्रकरणांचा तपास हाती घेतला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्रीय तपाय यंत्रणांच्या विशेष गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री उशिरा हे गुन्हे दाखल केले असून ठाणे आणि मुंबईमध्ये नोंदवलेल्या पाचही FIR आता सीबीआयने स्वतःच्या नियमावलीनुसार स्वतःची केस म्हणून पुन्हा नोंदवल्या आहेत.

हे देखील पहा -

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) २४ मार्च रोजी या प्रकरणांचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित केला होता. न्यायमूर्ती एस.के कौल आणि न्यायमूर्ती एम.एम सुंदरेश यांच्या खंडपीठाने म्हटले होते की राज्य पोलिसांवरील लोकांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी सखोल तपास करणे आवश्यक आहे. तसंच या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी हा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे.

परमबीर सिंग हे खंडणी, भ्रष्टाचार आणि गैरवर्तणुकीच्या अनेक प्रकरणात अडकले आहेत तसंच अँटिलिया बॉम्बस्फोटक प्रकरणाच्या कथित भ्रष्टाचारांच्या आरोपावरुन त्यांना मुंबई पोलीस प्रमुख पदावरून त्यांना हटवण्यात आल होतं. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने सिंग यांची राज्य सरकारने त्यांच्याविरोधात सुरू केलेली चौकशी रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली होती.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com