CBI Raid IN Mumbai: बँक फसवणूक प्रकरण, जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांच्या घरासह 7 ठिकाणी CBI चे छापे

Latest News: बँकेच्या फसवणूक प्रकरणी हा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
jet airways founder naresh goyal
jet airways founder naresh goyal Saam Tv
Published On

Mumbai News: जेट एअरवेजचे (jet airways) संस्थापक नरेश गोयल (naresh goyal) यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण यंत्रणा म्हणजेच सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने 538 कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणी नरेश गोयल यांच्या निवासस्थान आणि कार्यालयांसह 7 ठिकाणांची छापे टाकले आहेत. बँकेच्या फसवणूक प्रकरणी हा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jet airways founder naresh goyal
Navi Mumbai News: अवघ्या 2 रुपयांसाठी मुलाने गमावला जीव; बिळातले पैसे काढायला गेला, अन् सापाने केला दंश

मिळालेल्या माहितीनुसार, कॅनरा बँकेच्या 538 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी जेट एअरवेज आणि त्याचे संस्थापक नरेश गोयल यांच्या मुंबईतील घर आणि कार्यालयासह सात ठिकाणी छापे टाकले.

सीबीआयने शुक्रवारी नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता गोयल आणि विमान कंपनीचे संचालक गौरांग आनंद शेट्टी यांच्या निवासस्थान आणि कार्यालयांवर छापे टाकले. सीबीआयने कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून 538 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीचा नवीन गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेट एअरवेजच्या अनेक माजी संचालकांसह इतर अनेक आरोपींच्या निवासस्थान आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात येत आहेत. दिल्ली आणि मुंबईतील जेट एअरवेजच्या कार्यालयावर, एअरवेजचे माजी अधिकारी आणि नरेश गोयल यांच्या घर आणि कार्यालया वर छापे टाकण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, जेट एअरवेजने कॅनरा बँकेकडून सुमारे 538 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. याबाबत काही सरकारी कर्मचाऱ्यांसह इतरांवरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com