बीकेसी दुर्घटनेसाठी जबाबदार अधिकारी व कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा - अनिल गलगली

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंत्राटदार आणि अधिकारी वर्गानी केलेला अक्षम्य निष्काळजीपणा माफ करण्यायोग्य नाही.
बीकेसी दुर्घटनेसाठी जबाबदार अधिकारी व कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा - अनिल गलगली
बीकेसी दुर्घटनेसाठी जबाबदार अधिकारी व कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा - अनिल गलगली
Published On

मुंबई - बीकेसी अंतर्गत SCLR जोडरस्त्यांवर बीकेसी BKC आणि कुर्ला Kulra उड्डाणपूलाला जोडणा-या कामादरम्यान झालेली दुर्घटना सुरक्षा मानक आणि नियमांचे उल्लंघन असून यात झालेला अक्षम्य निष्काळजीपणा लक्षात घेता संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे.

हे देखील पहा -

मुंबई पोलीस Mumbai Police सहित एमएमआरडीएचे MMRDA महानगर आयुक्त यांस लिहिलेल्या पत्रात अनिल गलगली Anil Galgali यांनी नमूद केले आहे की आज पहाटे घडलेल्या दुर्घटनेत कामगार जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंत्राटदार आणि अधिकारी वर्गानी केलेला अक्षम्य निष्काळजीपणा माफ करण्यायोग्य नाही.

बीकेसी दुर्घटनेसाठी जबाबदार अधिकारी व कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा - अनिल गलगली
कल्याण-मलंग रोडवर पहाटेच्या सुमारास जिवंत अर्भक ठेवून जाणारी महिला CCTV मध्ये कैद!

पुलाचा काही भाग कोसळतो म्हणजे कामात दक्षता घेतली गेली नाही आणि हे कृत्य सरळसरळ कामगार वर्गाची हत्या करण्याच्या इराद्याने करण्याचा प्रयत्न आहे. असे गलगली यांचे म्हणणे आहे. अनिल गलगली यांनी महानगर आयुक्त, एमएमआरडीए यांस 30 ऑगस्ट 2021 रोजी एसएमएस करून कामाच्या संथगतीबाबत तक्रार सुद्धा केली होती. आज पोलिसांनी कारवाई केली तर भविष्यात अश्या चुका पुन्हा होणार नाही आणि दक्षता बाळगली जाईल, असे गलगली पुढे म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com