Video| बुलडाण्यात पडला सोन्याच्या मण्यांचा पाऊस ? जाणून घ्या व्हायरल सत्य

बुलडाण्यातील (Buldhana) मुंबई-औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील एका ठिकाणी नागरिकांची एकच गर्दी झाली. बुलडाण्यातील सोन्याच्या मण्यांच्या पावसाची साम टीव्हीने पतडाळणी केली आहे.
Buldhana news
Buldhana news saam tv

Rain of Gold Beads in Buldhana Rumors News : अनेकांनी राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडतोय अशी बातमी वाचली असेल. तर वेधशाळेने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. अशा आशयाच्या नानाविविध बातम्या आतापर्यंत वाचल्या असतील. मात्र, बुलडाण्यात सोन्याच्या मण्यांचा पाऊस पडला अशी बातमी जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे बुलडाण्यातील (Buldhana) मुंबई-औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील एका ठिकाणी नागरिकांची एकच गर्दी झाली. बुलडाण्यातील सोन्याच्या मण्यांच्या पावसाची साम टीव्हीने पतडाळणी केली आहे.

Buldhana news
VIDEO : भर मंडपात नवरदेव-नवरीमध्ये तुफान हाणामारी; कारण पण लय भन्नाट

बुलडाण्यात सोन्याच्या मण्यांचा पाऊस पडला, अशी बातमी लोकांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. बुलडाण्यात मुंबई-औरंगाबाद-नागपूर महामार्गावर डोनगावमध्ये हा सोन्याच्या मण्यांचा पाऊस पडल्याची बातमी लोकांमध्ये पसरली. त्यामुळे लोकांनी सोन्याचे मणी उचलण्यासाठी गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

सोन्याच्या मण्यांचा पावसाची बातमी लोकांमध्ये पसरल्याने त्यांनी एकच गर्दी केली. त्यामुळे सोन्याच्या मण्यांच्या पावसामुळे शेकडो लोकांनी गर्दी केली. लोकांच्या गर्दीमुळे रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली. सोन्याच्या मण्यांचा पावसावर स्थानिकांनी प्रतिक्रिया देत महामार्गावर जात असताना एका महिलेच्या गळ्यातील पोत तुटून त्यातले मणी रस्त्यावर विखुरल्याचं स्थानिकांनी सांगितले.

Buldhana news
VIDEO : पुण्यात पोलीस निरीक्षकाची दादागिरी; नागरिकाला बंद खोलीत लाथा बुक्यांनी मारहाण

एका स्थानिक व्यक्तीने सांगितले की, आम्ही त्या ठिकाणी गेलो, त्यावेळी तिकडे गर्दी दिसली. तिकडे गेल्यावर सोन्याचे मणी दिसले, परंतु तिकडे गेल्यावर ते मणी बेन्टेक्सच्या धातूचे निघाले. त्यामुळे सोन्याच्या मण्यांचा पाऊस पडला ही अफवाच असल्याचे आमच्या लक्षात आले. त्यामुळे तिकडे एकच हशा पिकला'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com