मुंबईतील ७२७ पोलीस अधिकाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीला ब्रेक

८ वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीला आता ब्रेक लागला आहे. कोव्हिडचा प्रादुर्भाव, पालिकाच्या निवडणुका व सण समारंभ या गोष्टींमुळे बदलींचे आदेश ६ महिन्यांसाठी थांबवण्यात आले आहेत.
मुंबईतील ७२७ पोलीस अधिकाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीला ब्रेक
मुंबईतील ७२७ पोलीस अधिकाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीला ब्रेकSaam Tv
Published On

मुंबई : ८ वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या पोलिस Police अधिकाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीला आता ब्रेक Break लागला आहे. कोव्हिडचा Covid प्रादुर्भाव, पालिकाच्या निवडणुका Elections व सण समारंभ या गोष्टींमुळे बदलींचे आदेश ६ महिन्यांसाठी थांबवण्यात आले आहेत. Break for inter district transfer of 727 police officers Mumbai

बदलींसाठी मुंबईतील Mumbai ७२७ अधिकाऱ्यांची यादी यावेळी तयार करण्यात आली होती. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणात पोलिस खात्याची बदनामी झाल्याने आता ८ वर्षांहून अधिक कालावधी मुंबई शहरात असणाऱ्या पोलिसांची आंतरजिल्हा बदली करण्यात येणार होत.

हे देखील पहा-

मात्र, शहरातील पोलिस दलात असलेली रिक्त पदे आणि कोव्हिड१९ चा प्रादुर्भाव तसेच सण, महापालिकांचे निवडणुका, गणपती, नवरात्र या गोष्टींवर झालेल्या पोलिस आस्थापन मंडळाच्या बैठकीत या आदेशावर ६ महिन्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे. शहरामध्ये ८ वर्षाहून जास्त काळ कार्यरत असलेले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक, व सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांची मुंबई बाहेर बदली करणार होती.

मुंबईतील ७२७ पोलीस अधिकाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीला ब्रेक
अभिमानास्पद! अमरावतीचे पोलीस शिपाई देणार 'परदेशात' सेवा

नवी मुंबई, ठाणे Thane आणि पुणे Pune या शहरांचा यामध्ये समावेश आहे. मुंबई पोलिसांच्या संबंधित ७२७ अधिकाऱ्यांना मुंबई शहराबाहेरील आपल्या पसंतीच्या ३ जागा निवडण्याचे आदेश दिले होते. पोलीस विभागातील भ्रष्टाचाराच हाणून काढण्याकरिता ही पावले उचलली जात आहेत. Break for inter district transfer of 727 police officers Mumbai

उद्योगपती मुकेश अंबानी Mukesh Ambani यांच्या अँटिलिया निवासस्थाना बाहेर स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन हत्या व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटींची वसुली करण्याचे कथित आदेश, दिल्याचे प्रकरण सचिन वाझेसह अनेक पोलीस अधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत. पोलीस अधिकाऱ्यांवर झालेले भ्रष्टाचार व गंभीर आरोप लक्षात घेत पोलीस विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com