मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या 'आधिश' बंगल्यात काही प्रमाणात अनधिकृत बांधकाम आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बांधकामाबाबत राणेंना एमआरटीपी कलम ५३ अंतर्गत नोटीस बजावली जाणार आहे. (BMC To Issue Notice To Narayan Rane)
राणे यांच्या बंगल्याच्या बांधकामाबाबत मुंबई महापालिकेने (BMC) त्यांना नोटीस बजावली होती. काल महापालिका अधिकाऱ्यांनी राणेंच्या (Narayan Rane) बंगल्याची पहाणी केली. त्यात काही प्रमाणात अनधिकृत बांधकाम केले गेले असल्याचे आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पाचव्या मजल्यावरील रेफ्यूज एरियामध्ये बांधकाम केल्याचे या पहाणीत स्पष्ट झाले आहे. तसेच महापालिकेने मंजूर केलेल्या आराखड्याप्रमाणे बंगल्यातील अंतर्गत बांधकाम नसून किरकोळ प्रमाणात अंतर्गत बांधकामात बदल करण्यात आल्याचीही माहीती सूत्रांनी दिली. काही प्रमाणात नियमांचे उल्लंघन करून अनधिकृत बांधकाम झाल्याने र एमआरटीपी ५३ अंतर्गत नोटीस दिली जाणार आहे.
या नोटीसीनंतर एक महिन्याच्या आत अनधिकृत बांधकाम काढण्यास मुभा दिली जाते किंवा इमारत प्रस्ताव विभागाकडे दंड भरून आणि शिल्लक एफएसआय वापरून हे बांधकाम नियमित करून घेता येते.
Edited By - Amit Golwalkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.