BMC ची थेट मुंबई मेट्रोवरच धडक कारवाई; पाणीपुरवठा पालिकेकडून खंडीत

अखेर या मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करण्यात येईल असे मुंबई महापालिकेने सांगितले आहे.
BMC
BMCSaam Tv
Published On

मुंबई: मुंबई महापालिका (BMC) प्रशासनानं यापूर्वी मुंबई मेट्रो (Mumbai Metro) १ च्या ११ मालमत्तांना नोटीस दिली होती. यात ८ मेट्रो स्थानकांचाही समावेश होता. मुंबई मेट्रोने २०१३ पासून आजतागायत ११७ कोटी ६२ लाख रुपये मालमत्ता कर थकविला आहे. थकीत कराची रक्कम २१ दिवसांमध्ये भरण्याचे निर्देश यापूर्वीच्या नोटीसमध्ये देण्यात आले होते. या कालावधीत थकबाकीची रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा न केल्यास या मालमत्तांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार असा ईशाराही दिला होता. त्यानुसार आज डिएन नगर, अंधेरी वेस्ट, येथे मेट्रोचा पाणीपुरवठा तोडण्यात आला आहे.

मालमत्ता कर वसूलीसाठी नोटीस बजावलेल्या मालमत्तांमध्ये आझादनगर मेट्रो स्थानक, डी. एन. नगर मेट्रो स्थानस, वर्सोवा मेट्रो स्थानक, एलआयसी अंधेरी मेट्रो स्थानक, पश्चिम द्रुतगती महामार्ग मेट्रो स्थानक, जे. बी. नगर मेट्रो स्थानक, एअरपोर्ट रोड मेट्रो स्थानक, मरोळ मेट्रो स्थानक या आठ स्थानकांचा समावेश आहे. यानंतरही कर न भरल्यास मलनिस्सारण वाहिनी खंडित करण्यात येणार आहे. अखेर या मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करण्यात येईल असे मुंबई महापालिकेने सांगितले आहे.

BMC
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पंतप्रधान मोदींच्या भेटीला, कारण...

दरम्यान काल मुंबई महापालिकेवरती असलेल्या प्रशासकांनी कर वसुलीसाठी धडक मोहिम हाती घेतली होती. थकीत कर वसुली महापालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मुंबई मेट्रोचीच कोट्यावधीची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. २०१३ पासून थकबाकी असल्यामुळे आता धडक कारवाई करण्यात आली असून पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला होता. पुण्यातही आगाखान पॅलेसची पाणीपट्टी थकीत असल्यामुळे पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला. परंतु त्वरीत रक्कम अदा केल्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला होता.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com