मुंबईत २५० केंद्रांवर ३५ लाख बालकांचे होणार लसीकरण

लहान मुलांच्या लसीकरणासाठी बीएमसीची तयारी
मुंबईत २५० केंद्रांवर ३५ लाख बालकांचे होणार लसीकरण
मुंबईत २५० केंद्रांवर ३५ लाख बालकांचे होणार लसीकरणSaam Tv
Published On

मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेने १८ वर्षाखालील बालकांसाठी आपत्कालीन परिस्थिती कोवोव्हॅक्स लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. ओमिक्रोनचा (Omicron) धोका सध्या वाढतोय. त्यात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने देखील १८ वर्षाखालील बालकांचं लसीकरण करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. (Mumbai Preparation for Children Vaccination)

केंद्र सरकार आणि आयसीएमआरची (ICMR) परवानगी मिळताच आठवडाभराच्या आत लसीकरणाला सुरुवात करण्यासाठी पालिकेने तयारी केली आहे. पालिकेकडून लसीकरणासाठी २५० केंद्र असणार आहेत. या केंद्रांवर साधारणतः ३५ लाखांवर बालकांच लसीकरण केलं जाणार आहे . जर लसीकरणासाठी मुलांचा प्रतिसाद वाढला तर लसीकरण केंद्रांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.

हे देखिल वाचा-

मुंबईत २५० केंद्रांवर ३५ लाख बालकांचे होणार लसीकरण
नाशिक महापालिकेचा पर्यावरणस्नेही निर्णय; रहिवासी सोसायट्यांना इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची सक्ती

बालकांच्या लसीकरणासाठी पालिकेच्या वैद्यकीय कर्मचाऱ्याना प्रशिक्षण देण्यात येणार आहे . सध्या असलेल्या लस साठा शितगृहात या लसींचा साठा ठेवला जाणार आहे. तसेच लसीकरण वेगाने होण्यासाठी जनजागृती अभियान देखील राबवल जाणार आहे.

बालकांना देण्यात येणाऱ्या लसीमध्ये पहिल्या डोस नंतर २८ व्या आणि ५६ व्या दिवशी असे तीन डोस देण्यात येणार आहेत. लस दिल्यानंतर त्याचे उलट परिणाम झाल्यास खबरदारीसाठी पेडियाट्रिक वॉर्डचा वापर केला जाणार आहे .

सध्या पालिकेच्या नायर रुग्णालयात २ ते १८ वर्ष वयोगटातील बालकांवर लसीकरणाची ट्रायल सुरू आहे . आता पर्यंत ४० जणांवर ट्रायल करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची सूत्रांची माहिती आहे. ज्यांना या ट्रायलमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी २३०२७०५ किंवा २३०२७२०४ या दूरध्वनी क्रमाकांवर संपर्क साधल्यास नोंदणी आणि मार्गदर्शन करण्यात येते आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com