Mumbai News: आज पालिका अधिकारी राणेंच्या अधिश बंगल्यात काय करणार?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बंगल्याबाबत अनधिकृत बांधकामाची नोटीस बजावल्यानंतर आता मुंबई महापालिकेचे पथक राणेंच्या अधिश बंगल्यात पोहोचले आहे.
Mumbai News: आज पालिका अधिकारी राणेंच्या अधिश बंगल्यात काय करणार?
Mumbai News: आज पालिका अधिकारी राणेंच्या अधिश बंगल्यात काय करणार?- Saam Tv
Published On

(सुशांत सावंत)

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बंगल्याबाबत अनधिकृत बांधकामाची नोटीस बजावल्यानंतर आता मुंबई महापालिकेचे पथक राणेंच्या अधिश बंगल्यात पोहोचले आहे. नारायण राणे यांचा मुंबईतील 'अधिश' बंगला अडचणीत सापडला असून, आज पालिकेचे अधिकारी राणेंच्या आदीश बंगल्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. (BMC Officials checking Narayan Rane Adhish Banglow in Mumbai)

नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू येथील Adhish बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार होती. या तक्रारीत राणेंचा (Narayan Rane) बंगला बांधताना सीआरझेडचे उल्लंघन झाले, तसेच बंगल्यात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे असा उल्लेख आहे.

Mumbai News: आज पालिका अधिकारी राणेंच्या अधिश बंगल्यात काय करणार?
संतापजनक..सहा वर्षीय चिमुकलीवर 56 वर्षीय नराधमाकडून अत्‍याचार

आज महापालिकेचे अधिकारी अधिश बंगल्यात काय करु शकतात याची ही माहिती...

याबाबत पालिका (BMC) अधिकाऱ्यांची टीम तपासणी करणार

गेल्या आठवड्यात पालिकेने नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती. त्यामध्ये तुमच्या बंगल्याबाबत काही तक्रारी आहेत. याची तपासणी करायची आहे. तसे पेपर तुम्ही तयार ठेवा असे राणेंना कळवले होते.

आता पालिका आलेली तक्रार राणेंना दाखवून जो भाग अधिकृत आहे त्याची तपासणी करतील

राणें ज्या पद्धतीने म्हणत आहेत की कुठलेही अनधिकृत बांधकाम नाही त्यामुळे राणेंकडील पेपरची तपासणी देखील अधिकारी करतील

संपूर्ण बंगल्याच्या बांधकामांची छायाचित्रे घेतली जातील...

रिटेनींग वॉल आणि बंगल्याचे बांधकाम यात ९ मीटरचे अंतर असणे गरजेचे आहे...याचेही उल्लंघन केले असल्याची तक्रार आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com