BMC News : दरडींच्या लगत राहणाऱ्या रहिवाशांचं सर्वेक्षण; पावसाळ्यात स्थलांतरीत होण्याचं आवाहन

BMC News : पावसाळा तोंडावर आल्यामुळे दरडींचा धोका वाढला आहे. जीवित आणि वित्त हानी होवू नये यासाठी दरडीलगत राहणा-या नागरिकांचे पालिकेने सर्वेक्षण केले असून त्यांच्या सुरक्षित स्थळी स्थलांतराच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत.
BMC News
BMC NewsSaam DIgital

पावसाळा तोंडावर आल्यामुळे दरडींचा धोका वाढला आहे. जीवित आणि वित्त हानी होवू नये यासाठी दरडीलगत राहणा-या नागरिकांचे पालिकेने सर्वेक्षण केले असून त्यांच्या सुरक्षित स्थळी स्थलांतराच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत. पालिकेने दरडींच्या लगत राहणा-या रहिवाशांना नोटीसाही पाठवेल्या असल्याची माहिती पालिकेने दिली.

पावसाळ्यात दरडींचा धोका असून नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या नोटीसा पालिकेने रहिवाशांना पाठविल्या आहेत. पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती ओढविल्यास किवा कोणतीही दुर्घटना घडल्यास संबंधित रहिवासी जबाबदार असतील, असे या नोटीसीत म्हटले आहे. पावसाळ्यात भांडुप, विक्रोळी घाटकोपर येथील १३ ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका असल्याचे पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांनाही नोटीस बजावली आहे.

BMC News
BMC News : मुंबई शहरात २० इमारती अतिधोकादायक; म्हाडाकडूनही यादी जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्व उपनगराती दरडींची नुकतीच पाहणी केली. यावेळी पालिका प्रशासनाला त्यांनी दरडींचा धोका असलेल्या नागरिकांचे पालिका आणि म्हाडाच्या पीएपीमध्ये तात्पुरते स्थलांतर करा अशा सुचना केल्या आहेत. पालिकेच्या विभाग स्तरावर आता पीएपी शोध सुरू असून तसेच एमएमआरडीच्या प्रशासनानेही आढावा घेण्यास सुरूवात केली आहे. पावसाळा कधीही सुरू होण्याची शक्यता असल्याने पालिकेला आणि एमएमआरडीएला सज्ज राहण्याचा सुचना करण्यात आल्या आहेत.

BMC News
Central Railway Mega Block: मध्य रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक, ठाण्यात ६३ तर सीएसएमटीत ३६ तासांचा ब्लॉक; ९३० लोकल फेऱ्या रद्द

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com