मुंबईच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; महापालिकेने उचलले 'हे' पाऊल

खड्डे भरण्याच्या सध्याच्या तंत्रज्ञानाच्या मर्यादा लक्षात घेता, खड्डे बुजवण्यासाठी नवीन अभियांत्रिकी पद्धतींची चाचपणी करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले आहेत.
BMC
BMC saam tv
Published On

सुमित सावंत

मुंबई : मुंबईतील (Mumbai) रस्त्यांवर सततच्या पावसामुळे तयार होणारे खड्डे बुजवले तरी पाऊस आणि वाहतुकीचा ताण यामुळे ते पुन्हा खड्डे होतात. खड्डे भरण्याच्या सध्याच्या तंत्रज्ञानाच्या मर्यादा लक्षात घेता, खड्डे बुजवण्यासाठी नवीन अभियांत्रिकी पद्धतींची चाचपणी करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले आहेत. (Mumbai News In marathi )

BMC
'लोकांचा नाथ एकनाथ', स्वखर्चातून विशेष विमानाने रुग्णांना बिहारमधून पुण्यात आणलं, त्यानंतर...

मुंबईत मागील काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे प्रामुख्याने डांबरी रस्त्यांवर खड्डे तयार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. हे खड्डे तात्काळ बुजवण्याची कार्यवाही केली जात असली तरी, सततचा जोरदार पाऊस आणि वाहतुकीचा ताण यामुळे पुन्हा खड्डे होतात. या पार्श्वभूमीवर अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी आज दिवसभर पश्चिम उपनगरातील विविध ठिकाणी भेटी देवून खड्डे बुजविण्याच्या कामांची पाहणी केली.

जवळपास बारा ठिकाणी प्रत्यक्ष क्षेत्रीय भेट देऊन रस्ते सुधारणा आणि खड्डे भरणी कामांची पाहणी केल्यानंतर अतिरिक्त आयुक्त श्री. वेलरासू यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सांगितले की, पावसाळ्यात रस्त्यांवर उद्भवणारे खड्डे भरण्यासाठी प्रामुख्याने विभाग कार्यालयांच्या स्तरावर कार्यवाही केली जात आहे. कोल्ड मिक्स सारखे तंत्रज्ञान वापरून खड्डे भरण्यात आले तरी जोरदार पाऊस आणि वाहतुकीच्या ताणामुळे खड्ड्यांचा टिकाव लागत नाही.

खड्डे पुन्हा तयार होवून खडी व इतर कण रस्त्यावर पसरून प्रसंगी अपघाताला देखील निमंत्रण देऊ शकतात. त्यामुळे त्यावर देखरेख करण्याचा अतिरिक्त ताण देखील मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) यंत्रणेवर येत आहे. अशा स्थितीत सर्वसामान्य नागरिकांची व वाहन चालकांची गैरसोय होऊ नये आणि खड्ड्यांच्या समस्येपासून मुक्तता मिळावी म्हणून लवकरात लवकर नवीन अभियांत्रिकी पद्धतींची चाचणी करणे आवश्यक आहे, असे वेलरासू यांनी नमूद केले.

BMC
विधापरिषदेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता असावा; नाना पटोले यांची मागणी

पुढे ते म्हणाले की, हायड्रोलिक प्रेस पद्धतीने तयार केलेले पेव्हर ब्लॉक्स हे तातडीने खड्ड्यात भरता येतात. जेणेकरुन वाहनांची वाहतूक लगेच सुरू करता येते. तसेच एम ६० ग्रेड मध्ये वेगवेगळ्या आकारामध्ये मोठ्या आकाराच्या लादी बनवून (प्रीकास्ट काँक्रिट प्लेट्स) वापरणे शक्य आहे किंवा कसे हे तपासावे. यामुळे खड्डे लवकर भरून वाहतूक लवकर सुरू होवू शकते.

ज्या-ज्या ठिकाणी शक्य आहे, तिथे एम ६० काँक्रिट वापरून खड्डा भरता येऊ शकेल व खड्डे भरणी मजबूत होईपर्यंत त्यावर पोलादी फळी (स्टील प्लेट) टाकावी जेणेकरून वाहतूक सुरळीत राहू शकेल याची देखील चाचपणी करण्यात यावी. अशा प्रकारची खड्डे भरणी किमान ३ ते ४ महिने टिकू शकते, त्यादृष्टीने देखील चाचपणी करावी, असेही अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले. फ्लाय ऍश अर्थात राखेपासून बनविलेल्या ब्लॉकचा देखील यामध्ये उपयोग करता येईल किंवा कसे, याचाही सांगोपांग विचार करण्याचे निर्देश वेलरासू यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com