ठाकरे सरकारच्या विरोधात 'शंखनाद' आंदोलन; - भाजपच्या तुषार भोसलेंचा इशारा!

दीर्घकाळापासून देवी-देवतांना बंदिस्त करून कंसासारखा कारभार करणाऱ्या सरकारला इशारा देण्यासाठी उद्या भाजप राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करणार असल्याचे आचार्य तुषार भोसले यांनी जाहीर केले.
ठाकरे सरकारच्या विरोधात 'शंखनाद' आंदोलन; - भाजपच्या तुषार भोसलेंचा इशारा!
ठाकरे सरकारच्या विरोधात 'शंखनाद' आंदोलन; - भाजपच्या तुषार भोसलेंचा इशारा!SaamTV
Published On

मुंबई : दीर्घकाळापासून देवी-देवतांना बंदिस्त करून कंसासारखा कारभार करणाऱ्या सरकारला इशारा देण्यासाठी उद्या भाजपBJP राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करणार असल्याचे : भाजप आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले Tushar Bhosale यांनी जाहीर केले आहे या आंदोलनामध्ये राज्यातील साधुसंत वारकरी आणि भारतीय जनता पक्षाचे हजारो कार्यकर्ते 'मंदिर हम खुलवायेंगे । धर्म को न्याय दिलायेंगे' हा देणार नारा देत हे आंदोलन करणार असल्याचेही भोसले यांनी जाहीर केले आहे.BJP's Tushar Bhosale's warning against Shankhanad agitation against Thackeray government

हे देखील पहा-

राज्यांमधील गर्दी कमी करा- केंद्र सरकार

जसजसे हिंदूंचेHindus Festival सण जवळ येत आहेत तसतसे ठाकरे सरकार मुद्दाम निर्बंध लावून सण साजरे करण्यास मनाई करत असल्याचा आरोप राज्यातील विरोधी पक्षाकडून सातत्याने होत आहे. मग येणारी दहीहंडीDahihandi साजरी करणारच असा इशारा देखील भाजपच्या काही राम कदमांनीRam Kadam दिला आहे. मात्र अशी परिस्थिती असतानाच केंद्रातील भाजप सरकारनेCentral goverment मात्र 'राज्यांनी गर्दीचे कार्यक्रम साजरे करु नये यासाठी राज्यांनी खबरदारी घ्यावी' असे निर्देष दिले आहेत मग मंदिरे उघडल्यामुळे गर्दी होणार नाही का? हा प्रश्न असतानाच केंद्रातील भाजपशासित सरकारनेच गर्दी न करण्याचा सल्ला राज्य सरकारला दिल्यामुळे राज्यातील भाजप तोंडघशी पडली आहे अशातच मंदिर उघडी करायची मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडी कडून सतत होत होतीच मात्र मंदिर उडण्यासाठी त्यांनी आंदोलनासाठी घातलेली साद ही राज्य सरकार विरोधातील की केंद्र सरकारच्या नियमावलीच्या विरोधीतील हे कळणं अवघड आहे.

मविआ सरकर मधील नेत्यांची लग्न आणि गर्दी

तसेच राज्य सरकार जनतेची काळजी करतो म्हणत असले तरी यांच्याच सरकार मधील जुन्नरJunner तालुक्यातील आदिवासी नेते जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे Devram Lande यांच्या मुलाच्या लग्नाला गर्दी तर होतीच मात्र कित्येक लोकांच्या तोंडाला मास्कहीMask नव्हते मग नियम फक्त सर्वसामान्यानीच पाळायचे आणि नेत्यांनी मोकाटच फिरायच आणि वावरायच का हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

तसेच नक्की जनतेची काळजी कोण करतय विरोधक की सत्ताधारी आणि नाटकी नक्की कोण करतय हे सर्वसामान्य जनतेला कळायला मार्ग नाही. शेवटी 'हम करे सो कायदा' याच चत्वाने राजकारणी चालतात मग विरोधक असो वा सत्ताधारी हाच सर्वसामान्य जनतेचा समज पक्का झाला आहे.

Edited By -Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com