'भाजपचे कार्यकर्ते हिंदुत्ववादी; हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे जातील त्यांचे आम्ही समर्थन करु'

'Amaravati मध्ये झालेला हिंसाचार हे गृह विभागाचे अपयश आहे. इतकी लोक रस्त्यावर येतात तुमचे काहीच नियोजन नसते.'
BJP Workers
BJP WorkersSaamTV

सुशांत सावंत -

मुंबई : आज सामनाच्या अग्रलेखामधून (Saamna Editorial) कंगना रणावतसह (Kangana ranaut) भाजपवरती निशाना साधला आहे. 'काही नेभळट आज शिवसेनेवर, हिंदुत्वावर लेक्चर देतात' असा टोला सामनामधून भाजपला लगावला आहे. याच लेखावरती भाजप नेते प्रवीण दरेकरांनी (Praveen Darekar) प्रतिक्रिया दिली आहे. 'संजय राऊत आणि सामना (Sanjay Raut and Samana) सकाळी उठून गरळ ओकने या व्यक्तिरिक्त त्यांना काही काम नसल्याची जहरी टीका त्यांनी सामनाच्या अग्रलेखावरती केली आहे.' (BJP workers are pro-Hindu)

हे देखील पहा -

शिवसैनिकांची भावना काय -

तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राज्यात किती फिरतात हे जनता पाहते. आपण किती काम करता यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या बातम्या येत नाही. संजय राऊत यांना इतका तणाव आलाय की त्यांना अस टोकाचे बोलावे लागत आहे. आज शिवसैनिकांच्या काय भावना आहेत त्याची तपासणी करून घ्यायला हवी असही दरेकर म्हणाले. शिवाय भाजपचे आज 300 च्या वर खासदार आहेत. फडणवीस या राज्याचे नेते आहेत. राज्यात सर्वाधिक पक्ष आमचा आहे. मुख्यमंत्री पद मिळाले पण आपले आमदार किती ? आहेत याचे आत्मचिंतन करा असा सल्ला त्यांनी राऊतांना दिला. तसेच नरेंद्र मोदी (Narendra Modi) साहेबांचे काम देशातील जनतेला माहीत आहे. एक खरे आहे त्या ठिकाणी बेशिस्त नाही. मोदीसाहेब हे शिस्तीचे नेतृत्व आहे. आज जो विकास दिसतो ती शिस्तीचा भाग आहे. केंद्रातील मंत्री सुसंवादातून काम करतो असं सांगतच केंद्रात शिस्त आहे मात्र राज्यात काय दिसते? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

भाजपचे कार्यकर्ते हिंदुत्ववादी -

BJP Workers
"शिवसेना-भाजप युतीसाठी बोलणी करणार; मात्र मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेच राहणार"

भाजपचे कार्यकर्ते हिंदुत्ववादी (Pro-Hindu) आहेत. हिंदूंच्या रक्षणासाठी आमचे लोक पुढे जातील त्यांचे आम्ही समर्थन करतो. मात्र ज्या लोकांनी तोडफोड केली त्यांच्याबद्दल कोणीच बोलत नाही. काही विशिष्ट प्रवृत्तीला सरकार पाठीशी घालत आहे. तसेच अमरावती मध्ये झालेला हिंसाचार हे गृह विभागाचे अपयश आहे. इतकी लोक रस्त्यावर येतात तुमचे काहीच नियोजन नसते. या घटना घडत असताना गृह विभागाकडे काय इनपुट होते. गृहविभागाचा निष्काळजीपणा याला जबाबदार असल्याचा आरोप देखील दरेकर यांनी केला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com