Chandrakant Patil| स्वातंत्र्य टिकवण्यासाठी मोदी प्रयत्न करत आहेत : चंद्रकांत पाटील

'स्वतंत्र टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत.आपल्या देशावर अतिक्रमण करणाऱ्या वस्तूंवर बहिष्कार कसा टाकता येईल याचा प्रयत्न सुरू आहे. नवीन शिक्षण धोरण मोदींनी केलं आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले
chandrakant patil
chandrakant patil saam tv
Published On

सचिन जाधव

पुणे : काही वर्षांपासून चिनी सैनिकांकडून भारतीय जवानांवर सुरू असलेल्या हल्ल्यानंतर भारतात चिनी वस्तूंवरील बहिष्काराची चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू झाली. देशातील राजकीय नेत्यांसहित सेलिब्रिटींकडून देखील भारतीयांना चिनी वस्तुंवरील बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात येते. त्यानंतर आता भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी चीनच्या विरोधातील भारताचे धोरण काय आहे, यावर थोडक्यात भाष्य केलं. 'स्वातंत्र्य टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) प्रयत्न करत आहेत.आपल्या देशावर अतिक्रमण करणाऱ्या वस्तूंवर बहिष्कार कसा टाकता येईल याचा प्रयत्न सुरू आहे. नवीन शिक्षण धोरण मोदींनी केलं आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. (Chandrakant Patil News )

chandrakant patil
ऐकावं ते नवलंच! पठ्ठ्याने स्वत:ला घोषित केलं सामाजिक न्यायमंत्री; नागरिकांच्या सोडवतोय समस्या

टिळक महाराष्ट्र विद्यापीठात लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त पुरस्काराचे वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. या सोहळ्यात ‘मिसाइल वुमन’ ही ओळख असलेल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वैमानिक प्रणालीच्या महासंचालिका आणि ‘अग्नी-4 व 5’ क्षेपणास्त्र प्रकल्पाच्या यशाच्या शिल्पकार डॉ. टेसी थॉमस यांना यावर्षी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं. या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे या कार्यक्रमाला उपस्थितीत होते. या कार्यक्रमात उपस्थितांना चंद्रकांत पाटील यांनी संबोधित केले.

chandrakant patil
सर्वात मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मागितली महाराष्ट्राची माफी

चंद्रकांत पाटील म्हणाले, 'भारताचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणामध्ये अनेक चढउतार ज्यांनी पाहिले, पण त्यांच्या चेहऱ्यावरच हास्य कधी गेलं नाही. खरंतर टिळकांची स्थितप्रज्ञता त्यांनाच कळली आहे. दीपक टिळक यांचं अभिनंदन. कारण १९८३ ते २०२३ पर्यत पुरस्कार देणं सोपं नाही,नाव शोधणं अन् त्यांना पुरस्कार देणं अवघड आहे. त्यांनी सातत्याने ४० वर्ष हा कार्यक्रम केला आहे'.

'लोकमान्य टिळक अनेकांनी वाचले. त्यांनी अनेक वर्षे जेल,कोर्ट कचेरी निपटत त्यांनी लिखाण केले. सर्वसामान्य माणसानं जवळ केलं. गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी करत लोकांजवळ गेले. चार सूत्र त्यांनी मानली ज्यात स्वदेशी स्वीकारलं, धर्म म्हणजे संस्कृती पूजा अर्चा नाही. लोकांना जोडायचा प्रयत्न केला', असेही पाटील म्हणाले.

चीनच्या विरोधातील भारताचे धोरण सांगताना पाटील म्हणाले, 'स्वातंत्र्य टिकवण्यासाठी मोदी प्रयत्न करत आहेत,आपल्या देशावर अतिक्रमण करणाऱ्या वस्तूवर बहिष्कार कसा टाकता येईल याचा प्रयत्न सुरू आहे,नवीन शिक्षण धोरण मोदींनी केलं आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com