Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न झाल्यानं भाजप आमदार नाराज?; आजच महत्वाची बैठक

Maharashtra Politics : नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी भाजपच्या सर्व आमदारांची महत्वाची बैठक आज संध्याकाळी होणार आहे, अशी माहिती मिळत आहे.
BJP MLA upset over Devendra Fadnavis not becoming CM ?; An important meeting today
BJP MLA upset over Devendra Fadnavis not becoming CM ?; An important meeting todaySaam TV
Published On

सुशांत सावंत

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं बंड, राज्यात रंगलेलं सत्तानाट्य, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उपमुख्यमंत्री करण्याचे भाजपच्या केंद्रातील नेतृत्वानं दिलेले आदेश या सगळ्या नाट्यमय घडामोडींनंतर यात आता भाजपमध्ये नाराजीनाट्याचा अंक सुरू झाला असल्याचं सध्या तरी दिसतंय. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री न झाल्यानं भाजप आमदारांमध्ये नाराजी असल्याचे सूत्रांकडून कळते. त्यामुळे ही नाराजी दूर करण्यासाठी आणि नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी भाजपच्या सर्व आमदारांची महत्वाची बैठक आज संध्याकाळी होणार आहे, अशी माहिती आहे. (Devendra Fadnavis Latest News)

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले सत्तानाट्य अखेर काल, गुरुवारी संपलं. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. हे सत्तानाट्य संपल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून तापलेलं राज्यातील राजकीय वातावरण निवळेल, असं वाटत असतानाच आता राजकारणानं नवं वळण घेतलं आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, मुख्यमंत्रिपदाची माळ एकनाथ शिंदेंच्या गळ्यात पडली. तर आपण मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही अशी घोषणा करणारे देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानंतर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीस हे मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून भाजपच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

BJP MLA upset over Devendra Fadnavis not becoming CM ?; An important meeting today
Politics : "बिचारे देवेंद्र फडणवीस" उपमुख्यमंत्रिपदावरुन प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री न झाल्याने भाजप आमदार नाराज असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आता ही नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे कळते. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील अशी सर्वच भाजप आमदारांना अपेक्षा होती. मात्र, चित्र वेगळंच दिसून आलं. यामुळे हे आमदार नाराज आहेत, असे समजते. या नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी आता भाजपकडून प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते आहे. आज, शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता भाजपच्या सर्व आमदारांची ताजमध्ये बैठक घेण्यात येणार आहे. या आमदारांची समजूत काढण्यासाठीच ही बैठक बोलावली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या बैठकीला भाजपचे आमदार आणि राज्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत. चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे आदी नेते या बैठकीला उपस्थित असतील, अशी माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com