'मुंबई बँकेच्या निवडणुकीत मनसे पाठींबा देण्यासाठी सकारात्मक'

राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक झाली पाहिजे.
'मुंबई बँकेच्या निवडणुकीत मनसे पाठींबा देण्यासाठी सकारात्मक'
'मुंबई बँकेच्या निवडणुकीत मनसे पाठींबा देण्यासाठी सकारात्मक'Saam TV
Published On

मुंबई : मुंबई बँकेच्या निवडणुकीत (Mumbai District Bank Election) मनसेने पाठिंबा द्यावा यासाठी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार आणि नेते प्रसाद लाड यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीत राज ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, तर दुसरीकडे UPA बाबत शिवसेनेची (Shivsena) भूमिका अजूनही स्पष्ट नाही त्यामुळे संजय राऊत यांना UPA चे अध्यक्ष करा म्हणजे गोंधळ कळेल, अशी खोचक टीका देखील प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केली आहे.

'मुंबई बँकेच्या निवडणुकीत मनसे पाठींबा देण्यासाठी सकारात्मक'
मोठी बातमी ! भीमा कोरेगाव आणि शहरी नक्षलवाद प्रकरणात पहिला जामीन मंजूर

राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक झाली पाहिजे. राजसाहेब ठाकरे यांची आज भेट घेतली प्रवीण दरेकर आणि राज ठाकरेंचं फोनवरती बोलणं करून दिलं. लवकरच प्रवीण दरेकर देखील त्यांची भेट घेणार असल्याचं प्रसाद लाड म्हणाले. आम्हाला अपेक्षा आहे ते राज ठाकरे स्वतः बरोबर येतील. आमची भेट होत असते परंतु जेव्हा दोन राजकीय पक्षातले लोक किंवा राजकीय लोक भेटतात तेव्हा राजकीय चर्चा नक्कीच होते. पण या बाबतीतला जो काही निर्णय असेल तो देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचा असेल असं मत प्रसाद लाड यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान मागच्या महिन्यात देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती. आता सध्या आमच्या समोर जिल्हा बँक निवडणूक आहे, मुंबईमध्ये सहकार पॅनेल निवडून आणणे महत्त्वाचे आणि त्याच प्रयत्नसाठी माझा प्रयत्न असल्याचं मत प्रसाद लाड यांनी व्यक्त केलं आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com