"सत्तेचा माज आला असेल ना, तर माज काढेन; मी घाबरत नाही कोणाला"

भाजप आमदार गणपत गायकवाड चांगलेच उल्हासनगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर संतापले आणि म्हणाले सत्तेचा माज आला असेल ना, तर मी माज काढेन.
"सत्तेचा माज आला असेल ना, तर माज काढेन; मी घाबरत नाही कोणाला"
"सत्तेचा माज आला असेल ना, तर माज काढेन; मी घाबरत नाही कोणाला"प्रदीप भणगे
Published On

कल्याण: कल्याण पूर्व मतदारसंघातील मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या उसाटने गावच्या जागेवर उल्हासनगर महापालिकेचा कचरा टाकला जाणार आहे.यासाठी महाराष्ट्र शासनाने उल्हासनगर महापालिकेला जागा देखील दिली आहे. मात्र या उसाटने गावच्या जागेवर कचरा टाकण्यास गावकऱ्यांचा विरोध आहे.मात्र अस असताना हि उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी सोमवारी पोलिसांचा फौजफाटा घेऊन शासनाने दिलेल्या जागेचे सीमांकान करण्यासाठी आले होते.

यावेळी स्थानिक भाजप आमदार गणपत गायकवाड चांगलेच उल्हासनगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर संतापले आणि म्हणाले सत्तेचा माज आला असेल ना, तर मी माज काढेन. मी घाबरत नाही कोणाला आणि सत्ताधारी यांना. असा शाब्दिक दमच आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.भाजपा आमदार गणपत गायकवाड अधिकाऱ्यांवर संतापले तो व्हीडिओ व्हायरल झाला आहे.BJP MLA Ganpat Gaikwad got angry with municipal officials

हे देखील पाहा-

याबाबत भाजप आमदार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की तीन दिवसांच्या आधी माझं आयुक्तांशी बोलण झालं होते आपण संयुक्त बैठक घेऊन गावकरी आणि आपण एकत्रित बैठक घेऊन जागा निश्चित करू पण एवढं सांगून देखील उल्हासनगर महापालिकेचे अधिकारी जबरदस्तीने गावकाऱ्यांवर दादागिरी करून कब्जा घेणारच म्हणत होते.

"सत्तेचा माज आला असेल ना, तर माज काढेन; मी घाबरत नाही कोणाला"
पुणेकरांना तातडीने शिथिलता द्या; महापौरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तसेच खर बोललं तर तिथे शाळा आहे, त्या शाळेत ३० गावची मुलं शिक्षण घेत आहेत. त्या शाळेच्या ५० मिटर बाजूपासून डम्पिंग या लोकांनी सुरू केलं आहे. तिथे मुलं शिक्षण घेऊ शकत नाही. म्हणून गावकऱ्यांची मागणी आहे की त्याच सर्वे नंबर मधील पुढील जागा आहे तिकडे डम्पिंग घ्या ,पण राजकारण करून दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मी त्यांना म्हणून धारेवर धरल आणि त्यांना विचारणा केली की तुम्ही चुकीचं काम का करता म्हणून ,तुम्हाला अस करायचं असेल तर तुमच्या महापालिकेच्या सरकारी जागा आहेत तिथे प्रकल्प का नाही करत ? बिल्डर लोकांकडून पैसे घेऊन हा डंपिंग इकडे सरकवला आहे. असा आरोपही आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे.

Edited By- Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com