Tipu Sultan Controversy: "समस्त हिंदुंतर्फे तुम्हाला साद घालतोय"- आ. अमीत साटम यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Tipu Sultan Controversy: टिपू सुलतान उद्यानाच्या नावावरून सुरू असलेल्या वादावर आता भाजपचे आमदार अमीत साटम यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
Tipu Sultan Controversy
Tipu Sultan ControversySaam Tv
Published On

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: मालाड मधील मालवणी भागात एका क्रीडा संकुलाला दिलेल्या टिपू सुलतान (Tipu Sultan) या नावावरून मुंबईतील (Mumbai) राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. याप्रकरणी भाजप आमदार अमीत साटम (Ameet Satam) यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहित या ठिकाणी अवैध बांधकाम होत असल्याचे सांगत मुख्य सचिवाद्वारे या प्रकाराची सखोल चौकशी करावी आणि गुन्हेगाराला शिक्षा करावी अशी मागणी केली आहे. ("I am calling you on behalf of all Hindus" - MLA Amit Satam's letter to the Chief Minister Uddhav Thackeray)

हे देखील पहा -

आपल्या पत्रात आमदार अमीत साटम मुख्यमंत्र्यांना म्हणाले की,

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख पत्र लिहताना माझी द्विधा मनस्थितीमध्ये होत आहे. कारण तुम्हाला मुख्यमंत्री म्हणू की शिवसेना पक्षप्रमुख म्हणून साद घालावी. यामुळेच मी समस्त हिंदूतर्फे (Hindu) तुमच्या दोन्ही पदाला साद घालण्याचे ठरवले. आपल्या महापौर किशोरीताई पेडेणेकर (Kishori Pednekar) एका बाजूला जाहीरपणे मान्य करतात की टिपू सुलतान (Tipu Sultan) क्रिडांगण नामकरणाचा फलक अवैध आहे आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, तर दुसऱ्या बाजूला त्याचाच बचाव करण्यासाठी खोटे बनावटी दस्ताऐवज वापरतायेत. वास्तविकतेत जर टिपू सुलताना नामफलक अवैध असले तर महापौरांनी ते उतरवले पाहिजे होते. पण पालक मंत्र्यांच्या (Aslam Shaikh) बचाव कार्यातच त्या मग्न आहेत असा आरोप त्यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर केला.

Tipu Sultan Controversy
Aditya Thackeray: १००% राजकारणासाठी ठाकरेंचं राजकीय सीमोल्लंघन

पुढे ते म्हणाले की, धक्कादायक बाब म्हणजे सदर जागा ही सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी महसूल पत्रकात नोंदवलेली आहे आणि पालक मंत्री अवैध रित्या टिपू सुलतान क्रिडांगण बांधतायेत, इतकेच नाही तर जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा सुद्धा अवैध कामाकरिता गैरवापर करतायेत असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांमार्फत चौकशी (Investigation) करावी गुन्हेगारांवर कारवाई करावी अशी मागणी अमीत साटम यांनी केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com