भाजप महिला मोर्चाच्या सुल्ताना खान यांच्यावर जीवघेणा हल्ला! थोडक्यात बचावल्या

हल्लेखोरांनी त्यांच्या पतीलाही शिवीगाळ केली.
Mira Road News
Mira Road NewsSaam Tv
Published On

मुंबई - मीरा रोड मध्ये भाजप (BJP) महिला मोर्चा महाराष्ट्रच्या प्रदेश महिला प्रमुख सुल्ताना समीर खान (Sultana Khan) यांच्या गाडीवर दोन अज्ञात इसमानी मध्य रात्री जीवघेणा हल्ला केला आहे. यात सुल्ताना यांच्या डाव्या हातावर दुखापत झाली आहे. काल रात्री सुल्ताना ह्या त्यांच्या पतीसोबत कारने डॉक्टरांना भेटण्यासाठी जात असताना एवढ्यात मीरा रोड (Mira Road) मधील नया नगर जवळ दुचाकी वरून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन तरुणांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर त्यांनी गाडीवर हल्ला केला. एवढेच नाही तर हल्लेखोरांनी त्यांच्या पतीलाही शिवीगाळ केली.

हे देखील पाहा -

तसेच धारधार शस्त्रने सुल्ताना यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सुल्ताना यांच्या हाताला दुखापत झाली त्यानंतर त्यांना तात्काळ त्यांच्या पतीने मीरा रोडच्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले. त्या जबाब देण्याच्या स्थिती मध्ये नसल्याने त्यांची अजून तक्रार नोंद करण्यात आली नाही.

Mira Road News
दिवसभरात पाणी किती प्रमाणात प्यायला हवे? पाणी प्यायल्यामुळे शरीराला नेमका फायदा कसा होतो?

४ जुलैला एका व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्याला मुंबईच्या पदाधिकारी कडून धमकी येत असल्याचे सांगितले होते. त्यांचा पूर्वीचा व्हिडिओ कुणीतरी डिलीट केल्याचे सांगण्यात येत आहे. ‘ना डरी हूँ… ना डरूँगी’ असे सुल्ताना खान यांनी आपल्या शेवटच्या व्हिडीओमध्ये म्हटले होते. त्यामुळे या हल्ल्यातील आरोपी कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com