सोनिया गांधींच्या चरणाची धुळ माथ्यावर लावताय: भातखळकरांची राऊतांवर बोचरी टीका

Atul Bhatkhalkar On Sanjay Raut: लवकरात लवकर एक मानसोपचार तज्ञ गाठा आणि ED ला सामोरे जा असा खोचक सल्ला त्यांनी राऊतांना दिला आहे.
bjp leader slams to sanjay raut on offensive statement about mumbai
bjp leader slams to sanjay raut on offensive statement about mumbaiSaam Tv
Published On

मुंबई: मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज केला आहे. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी दिल्लीत प्रयत्न सुरु आहेत, यासाठी किरीट सोमय्या प्रझेंटेशन घेऊन दिल्लीला जात आहेत असा आरोप राऊतांनी केला. याबाबथ भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राऊतांवर बोचरी टीका केली आहे. तसेच लवकरात लवकर एक मानसोपचार तज्ञ गाठा आणि ED ला सामोर जा असा सल्ला भातखळकरांनी राऊतांना दिला आहे.

हे देखील पहा -

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांवर टीका करताना म्हटलं की, "भ्रमिष्ट बोरूबहाद्दर संजय राऊत आता म्हणत आहेत की मुंबई केंद्रशासित करण्याचा भाजपचा डाव आहे. संजय राऊत तुम्हाला आता खरच मानसोपचार तज्ञाची गरज आहे. एन्जायटीमुळे, घाबरटपणामुळे तुम्ही मानसिक रूग्ण झाला आहात. ज्या मुंबईला तुम्ही लुटून, ओरबाडून खाल्लं ती मुंबई तुमचे कितीही प्रयत्न झाले तरी वेगळी होणार नाही. ज्या कॉंग्रेसनं संपुर्ण देशात सर्वांना भाषेच्या आधारावर राज्य दिलं, पण केवळ मराठी भाविकांना ते मिळवण्यासाठी १०५ हुतात्मे झाले, त्या कॉंग्रेसच्या सोनिया गांधींच्या चरणाची धुळ माथ्यावर लावताय" अशी बोचरी टीका भातखळकरांनी केली आहे. तसेच लवकरात लवकर एक मानसोपचार तज्ञ गाठा आणि ED ला सामोरे जा असा खोचक सल्ला त्यांनी राऊतांना दिला आहे.

मुंबईबाबत राऊत काय म्हणाले होते?

शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी दिल्लीत प्रयत्न सुरु आहेत. यासाठी किरीट सोमय्या प्रझेंटेशन घेऊन दिल्लीला जात आहेत. आजही ते दिल्लीला गेले आहेत. माझं गेल्या दोन महिन्यांपासून ते काय करत आहेत यांच्याकडे लक्ष आहे. मुंबईला महाराष्ट्रासपासून वेगळं करण्यासाठी मुंबईतील धनधांगडी लोक प्रयत्न करत असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

bjp leader slams to sanjay raut on offensive statement about mumbai
राज ठाकरेंची लायकी नाही, त्यांना बेड्या ठोकून तुरुंगात टाका : अबू आझमी

मी कोणतेही आरोप विना पुराव्याचे करत नाही. आयएनएस विक्रांतच्या नावावर पैसे घेऊन ते पैसे राज्यपाल भवनात भरले नसल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत, असा दावा आज शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. राऊत यांचे काल दिल्लीतून मुंबई येथे आगमन झाले झाले. शिवसेनेकडून (Shivsena) रॅली काढून त्यांचे स्वागत करण्यात आले आहे.

काल झालेलं समर्थन किंवा शक्तीप्रदर्शन नाही हा लोकांचा संताप आहे, काल सेनेचे राज्यात आंदोलन झाले. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली जाते, त्यांच्याविरोधातील हा संताप आहे. असंही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com