Video | उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर भाजप नेत्याची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'आपल्या मालमत्तेचं...

घरोघरी तिरंगा अभियानावरून शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Pravin Darekar News
Pravin Darekar News saam tv

सुशांत सावंत

मुंबई : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाल्याचे निमित्ताने मोदी सरकारकडून वेगवेगळे उपक्रम, मोहिमा राबविल्या जात आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी घरोघरी तिरंगा अभियनाची घोषणा केली. या अभियानावरून शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Pravin Darekar News
ज्यांच्याकडे घर नाही, ते तिरंगा कुठे लावणार ? उद्धव ठाकरेंनी साधला मोदी सरकारवर निशाणा

स्वातंत्र्यदिनानिमित्त मोदी सरकारने घरोघरी तिरंगा कार्यक्रम दिला आहे. पण ज्यांच्याकडे घरच नाही. ते लोक तिरंगा कुठे लावणार ? असा सवाल करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. प्रवीण दरेकर म्हणाले, 'भारत माता ही आपली मालमत्ता असल्यासारखे उद्धव ठाकरे यांना वाटत आहे. खरं म्हणजे शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची मालमत्ता. त्यांनी आपल्या मालमत्तेचं आत्मपरिक्षण करायचं सोडून दिलं आहे. त्यांचे ४० आमदार त्यांना सोडून गेले आहेत'.

Pravin Darekar News
Pankaja Munde|मी कोणासमोरही झुकणार नाही; पंकजा मुंडेंचा नेमका रोख कोणाकडे ?

प्रवीण दरेकर म्हणाले,' उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील पदाधिकारी त्यांना सोडून जात आहेत. तरी त्यांचे टोमणे मारणे, मत्सराने बोलणे हे त्यांच्याकडून जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा भारतीय जनता पक्ष असेल. त्यांनी भारताला भारत माता म्हटलं आहे. भारताला मातेसमान मानून त्यांची पूजा करतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी भारतमातेसंदर्भात शिकवू नये, आपण आपल्या मालमत्तेची काळजी घ्यावी'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com