Pravin Darekar : भाजपा नेते प्रवीण दरेकरांना मोठा दिलासा! 'त्या' प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चीट

भाजपा नेते प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
Pravin Darekar Latest News
Pravin Darekar Latest News Saam TV
Published On

Pravin Darekar Latest News : भाजपा नेते प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबै बँकेच्या १२३ कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हे शाखेने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून प्रवीण दरेकर यांचं नाव वगळलं आहे. त्यांच्यासोबत इतर संचालकांची नावे सुद्धा वगळण्यात आली आहेत. या सर्वांविरुद्ध पुरावे नसल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने म्हटले आहे. (Latest Marathi News)

Pravin Darekar Latest News
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल कोश्यारींची लवकरच उचलबांगडी होणार? भाजप मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

काय आहे प्रकरण?

प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे 2000 पासून मुंबै बँकेचे संचालक होते. तसेच ते 2010 पासून बँकेचे अध्यक्ष देखील आहे. २०१५ मध्ये मुंबै बँकेच्या मुंबईतील ठाकूर व्हिलेज, कांदिवली, दामुनगर आणि अंधेरी पूर्व येथील शाखांमध्ये बनावट कर्ज घेतल्याची माहिती उघड झाली.

या घोटाळ्याप्रकरणी विवेकानंद गुप्ता यांच्या तक्रारीवरून प्रवीण दरेकर, शिवाजी नलावडे आणि राजा नलावडे यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. १९९८ पासून १२३ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं होतं.

हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर दरेकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी दाखल केलेल्या आरोपत्रामध्ये जवळपास दहा मजूर संस्थांना आरोपी केले आहे.

मात्र, दरेकर आणि इतर संचालकांच्या सहभागाबाबत कोणताही पुरावे सापडला नसल्याचे म्हटले आहे. हे आरोपपत्र पोलिसांनी सादर केले असले तरी न्यायालयाकडून यावर स्वीकारल्याची मोहोर मारण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com