'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं वाचून माझ्याकडे या'; चंद्रकांत पाटील यांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर

शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील अत्यंत आक्रमक झालेले पाहायला मिळाले. चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
chandrakant patil and Rohit Pawar
chandrakant patil and Rohit Pawar Saam Tv
Published On

Chandrakant Patil News : भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील अत्यंत आक्रमक झालेले पाहायला मिळाले. चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. प्रसार माध्यामांशी संवाद साधताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या टीकेला देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

chandrakant patil and Rohit Pawar
Chandrakant Patil: दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही टार्गेट करणं योग्य नाही; फडणवीसांकडून पाटलांवरील शाईफेकीचा निषेध

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईहल्ला झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. चंद्रकांत पाटील म्हणाले, 'माझ्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता. कोणत्या तरी पत्रकाराने हे केलं आहे. तसेच शाईहल्ला करण्यावर कारवाईची मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली'.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी यावेळी रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. 'मी चळवळीतून पुढे आलो आहे. तुमच्या सारखा कुटुंबीयांच्या जीवावर मोठा झालेलो नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तक वाचून माझ्याकडे या, असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी रोहित पवारांना दिलं आहे.

काय म्हणाले होते रोहित पवार?

चंद्रकांत पाटील यांच्या शाईफेकीचा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत निषेध केला. रोहित पवार म्हणाले, 'चंद्रकांतदादांचं वक्तव्य हे योग्य नव्हतं, त्याचा निषेधच. पण म्हणून त्यांच्यावर केलेली शाईफेक योग्य नाही. थोर व्यक्तींच्या आपण आत्मसात केलेल्या विचाराच्या विरोधात एक विचार अनेक वर्षांपासून काम करत आहे, त्याचा विरोध हा आपण सर्वांनी वैचारिक आणि संवैधानिक मार्गानेच करणं गरजेचं आहे'.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या प्रतिक्रियेचा खरपूस समाचार घेतला. ' शाई फेक ही स्वाभाविक प्रक्रिया भुजबळ म्हणतात. पण त्यांच्यावर ही शाईफेक केली तर त्यांना चालेल का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com