दानवे, गडकरींनंतर आता भाजप नेते कृपाशंकर सिंग राज ठाकरेंच्या भेटीला

राज ठाकरे मागील काही दिवसांपासून हिंदुत्वाची भूमिका घेत असल्याने कृपा शंकर सिंग आणि राज ठाकरेंच्या भेटीला महत्त्व आहे.
Raj Thackeray Kripashankar Singh Meeting News, Raj Thackeray News Updates, Kripa Shankar meet Raj Thackeray
Raj Thackeray Kripashankar Singh Meeting News, Raj Thackeray News Updates, Kripa Shankar meet Raj ThackeraySaam TV
Published On

सुशांत सावंत

मुंबई: गुढीपाडव्याच्या भाषणनंतर झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी राज ठाकरेंनी काल ठाण्यात उत्तर सभा घेतली. त्यांनतर राज ठाकरे हे भाजपचा प्रचार करत आहेत. मनसे म्हणजे भाजपची बी टीम अशी टीका विरोधकांनी केली. गुढीपाडव्याच्या भाषणानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भेटीला गेले होते, तेव्हा राजकीय वर्तुळात भाजप-मनसे युतीच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. आज भाजप नेते कृपाशंकर सिंग राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहे त्यामुळे पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. राज ठाकरे मागील काही दिवसांपासून हिंदुत्वाची भूमिका घेत असल्याने कृपाशंकर सिंग (Kripashankar Singh) आणि राज ठाकरेंच्या भेटीला महत्त्व आहे. (Raj Thackeray News Updates)

Raj Thackeray Kripashankar Singh Meeting News, Raj Thackeray News Updates, Kripa Shankar meet Raj Thackeray
''राज ठाकरे भाजपची तळी उचलत आहेत; निवडणुका आल्यावर मनसे सुपारी घेते''

दरम्यान मागच्या काही काळापासून मनसे ही भाजपची बी टीम असल्याचा उल्लेख होत आहे. राज ठाकरेंच्या भाषणाची हे भाजपने लिहून दिले होते अशीही टीका विरोधकांनी राज ठाकरेंवरती केली होती. दरम्यानच्या काळात रावसाहेब दानवे, नितीन गडकरी यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती. या अगोदर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती. तेव्हापासून भाजप-मनसे युतीच्या चर्चा सुरु आहेत. राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेली भूमिका ही भाजपच्या भूमिकेशी जुळती आहे त्यामुळे राज ठाकरे हे भाजपचा प्रचार करत असल्याचीही टीका होत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com