राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली; आमदार आशिष शेलारांची टीका

15 एप्रिल पासून 30 पर्यंत पूर्ण राज्यभर प्रवास करणार आहे. यात आमची भूमिका आणि पक्षाची पायाभरणी करणार असल्याचे शेलार म्हणाले.
Ashish Shelar
Ashish ShelarSaam Tv News
Published On

मुंबई: भाजपचे (BJP) माजी आमदार शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik) आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी (NCP) मध्ये प्रवेश करणार आहेत. या पार्श्वमूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकत आहे. त्यामुळेच ते अशी कृत्रिमपणे नेते फोडत आहेत, अशी टीका आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राष्ट्रवादीवर केली आहे. आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईमध्ये पार पडली.

येणाऱ्या काळात निवडणुका (Election) कधी होतील यात शंका आहे, पण आम्ही येणाऱ्या निवडणुकांबाबत रणनीती आखली आहे. आम्ही 15 एप्रिल पासून 30 पर्यंत पूर्ण राज्यभर प्रवास करणार आहे. यात आम्ही आमची भूमिका आणि पक्षाची पायाभरणी करणार आहे. येणाऱ्या काळात आम्ही आता जनसामान्यांचे मुद्दे घेऊन जाणार असल्याचे शेलार (Ashish Shelar) म्हणाले.

अर्थसंकल्पात एक यशस्वी विरोधी पक्षाचा रोल काय असतो हे आम्ही दाखवले आहे. आता आम्ही जनसामान्यांचे मुद्दे आम्ही घेऊन जाणार आहोत, मुंबईत 15 तारीखेपासून पोलखोल अभियान आखणार आहे. आम्ही पूर्ण राज्याचा दौरा करणार आहे. हा दौरा 12 नेते करणार आहेत. या दौऱ्यात स्थानिक राजकीय गणिते, स्थानिक राजकारण, लोकसभा निवडणुका (Election) पर्यत पूर्ण योजना होणार आहे.

यावेळी शेलार यांनी काँग्रेसच्या (Congress) नाना पटोले (Nana Patole) यांच्या राहुल गांधी पंतप्रधान होतील या विधानावर टीका केली. स्वप्न पडायला काही टॅक्स लागत नाही अशी टीका त्यांनी केली. संजय राऊत यांनी मौन राहणं ठरवलं आहे तेवढं तरी त्यांना करू द्या, नाहीतर जनता त्यांना उठाबशा करायला लावेल अशी टीकाही त्यांनी राऊत यांच्यावर केली.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com