Kirit Somaiya vs Anil Parab : भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. म्हाडा येथील कार्यालयाबाबत किरीट सोमय्या यांचे सर्व आरोप खोटे असून सोमय्या तोडांवर आपटले. त्यांच्यावर 100 कोटींचा दावा ठोकणार, असा घणाघात अनिल परब यांनी केला होता. त्यावर आता किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Maharashtra Political News)
'हिसाब तो लेकर रहेंगे', असं म्हणत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अनिल परब (Anil Parab) यांना डिवचलं आहे. इतकंच नाही तर, कार्यालय म्हणून कोण ही जागा वापरत होतं. अनधिकृत जागेची कुणाची मालकी असते का ? असा सवालही किरीट सोमय्या यांनी केला. २०१९ जून मध्ये अनिल परब यांनी नोटीस दिली होती. जाग यायला ३६ महिने लागले. हिसाब तर लेकर रहेंगे. असंही किरीट सोमय्या म्हणाले. (Latest Marathi News)
'हेच नटवरलाल (अनिल परब) दापोली साई रिसॉर्ट मध्ये माझा काही संबंध नाही असे सांगत होते. नटवरलालवर सहा गुन्हे दाखल झाले. भ्रष्टाचार करून हॉटेल गाळे बांधले त्याचा हिशोब द्यावाच लागणार, असं खुलं आव्हान देखील किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांना दिलं आहे.
काय आहे प्रकरण?
अनिल परब यांच्या कार्यालयावर म्हाडाकडून कारवाई करण्यात आल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. पण याबाबतची कारवाई आपल्याकडून करण्यात आलेली नाही, असं म्हाडाने अधिकृतपणे स्पष्ट केलं. त्यामुळे अनिल परब यांच्या कार्लायलयाच्या पाडकामावरुन राजकारण पेटलं होतं.
विशेष म्हणजे अनिल परब आज म्हाडाच्या कार्यालयात गेले. त्यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत तब्बल चार तास चर्चा केली. त्यानंतर आपला या अनधिकृत बांधकामाशी काहीच संबंध नाही, असा म्हाडाकडून लेखी स्वरुपात पुरावा आणल्याचं जाहीर केलं. त्यानंतर एक पत्रकारपरिषद घेत म्हाडा येथील कार्यालयाबाबत किरीट सोमय्या यांचे सर्व आरोप खोटे असून सोमय्या तोडांवर आपटले. त्यांच्यावर 100 कोटींचा दावा ठोकणार, असा घणाघात अनिल परब यांनी केला.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.