Chandrakant Patil: शाईफेक करणाऱ्यांवर कलम 307चा गुन्हा, 11 पोलिसांचं निलंबन; चंद्रकांत पाटील कारवाईबाबत म्हणतात...

पोलिसांवरील कारवाई हा निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.
Chandrakant Patil
Chandrakant Patil saam Tv
Published On

पुणे : राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)   यांनी काही दिवसांपूर्वी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील वातारवरण चांगलंच तापलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या याच वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांच्यावर काल पुण्यात शाईफेक झाली होती. यानंतर राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन आक्रमक होताना दिसत आहे.

शाईफेक करणारा मनोज गरबडे याच्याविरोधात पोलिसांनी कलम 307 म्हणजे हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 11 पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

या कारवाईबाबत बोलतांना चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, घडलेला प्रकार फ्री प्लान होता. याचे सगळे पुरावे आता कागदावर आले आहेत. त्यांना निषेध करायचा होता की मला जखमी करायचं होतं. माझ्या डाव्या डोळ्याला कॅन्सर होता, माझ्या डोळ्यातला एक भाग गोधडी सारखा शिवलेला आहे. त्यामुळे हा हल्ला माझ्या जीवावर बेतणारा होता, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

Chandrakant Patil
Chandrakant Patil: मी तुमची सगळी प्रकरणं बाहेर काढणार; चंद्रकांत पाटलांचं पवार घराण्याला डायरेक्ट चॅलेंज

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की प्रत्येक गोष्ट कायद्याने व्हायला हवी. पण तुम्ही कायदा हातात घेतला. घटना पायदळी तुडवला. मला डायरेक्ट मारायचं होतं का जखमी करायचं होतं का? ही निषेधाची पद्धत आहे का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

आज आम्ही कलेक्टर कचेरीसमोर निदर्शने केली. कलेक्टर यांना सगळे पुरावे दिले. नेम धरून डोळ्यावर शाही फेकली गेली. माझ्या डॉक्टरांनी हे पाहिल्यानंतर डॉक्टर अस्वस्थ झाले होते. डॉक्टर म्हणाले तुम्ही दवाखान्यात येईपर्यंत मी घरी जाणार नाही. मी रात्री बारा वाजता दवाखान्यात गेलो, अशी माहितीही त्यांनी दिली.

Chandrakant Patil
Chandrakant Patil Exclusive: शाईफेक हल्ल्यानंतर चंद्रकांत पाटलांची सविस्तर मुलाखत; पवार-ठाकरेंना घराणेशाही हवी असल्याचा गंभीर आरोप

पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई

पोलिस कर्मचाऱ्यांवर झालेली निलंबनाची कारवाईत माझी काहीही भूमिका नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा तो विषय आहे. निलंबनामुळे कुटुंब डिस्टर्ब होतं, ट्रान्सफर बाबतची कारवाई ठिक आहे. पण हा निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

दाखल गुन्ह्यांबाबत मी बोलणार नाही

शाईफेक करणाऱ्यांवर जी कलमं लावली मी नाही लावतीत. प्रशासनाने ही कारवाई केली आहे तर प्रशासनाला जाब विचारावा. ज्यांच्यावर कलमं लावली आहेत त्यांना कोर्ट आहे. छगन भुजबळ यांना कोर्टाने जामीन दिला, भुजबळ जामिनावरच आहेत. भुजबळ साहेब यांना जसा कोर्टाने न्याय दिला जसा संजय राऊत यांना दिला तसा त्यांनाही मिळेल, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com