भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार अर्ज मागे; संजय उपाध्याय यांची प्रतिक्रिया

पक्षाने मला उमेदवारी देत माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबाबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार अर्ज मागे; संजय उपाध्याय यांची प्रतिक्रिया
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार अर्ज मागे; संजय उपाध्याय यांची प्रतिक्रियारामनाथ दवणे
Published On

मुंबई : राज्यसभा पोटनिवडणूकीसाठी Rajya Sabha by-election भाजपचे उमेदवार असणारे मुंबई भाजपा सरचिटणीस Mumbai BJP general secretary संजय उपाध्याय Sanjay Upadhyay यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या सूचनेनुसार मी माझा अर्ज मागे घेतला आहे. तसेच पक्षाने मला उमेदवारी देत माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबाबद्दल मी त्यांचा आभारी आहे असे वक्तव्य आज उपाध्याय यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे. (BJP candidate Sanjay Upadhyay's application withdrawn)

हे देखील पहा -

काँग्रेसचे Congress राजीव सातव Rajiv Satav यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होणार होती मात्र नेहमीच मृत व्यक्तीची जागा त्याच पक्षाला दिली जाते त्यासाठी निवडणूक लढवली जात नाही असा अलिखीत राजकारणाचा निदान राज्यात तर नियम असल्याची आठवण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnvis यांना करुन दिली होती आणि याच संबंधीत पक्षाच्या बैठकीनंतर आपला निर्णय कळवतो असे आश्वासन देखील फडणवीस यांनी पटोले आणि थोरातांना दिले होते दरम्यान आज भाजपच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसच्या रजनी पाटलांचा राज्यसभेवरती जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार अर्ज मागे; संजय उपाध्याय यांची प्रतिक्रिया
धक्कादायक|'इंस्टाग्राम'द्वारे झालेल्या ओळखीचा घेतला गैरफायदा; जिच्याशी ओळखं तीचंच केलं अपहरण

काँग्रेसचे नेते दोन वेळा देवेंद्र फडणवीस यांना ही राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून भेटले होते आणि या सर्व परिस्थितीवरती भाजपच्या कोअर कमिटीच्या BJP's core committee सदस्यांशी चर्चा करुन जो वरिष्ठांनी निर्णय घेतला आहे त्यानुसार मी अर्ज मागे घेतला असे संजय उपाद्य यांनी सांगितले तर राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या काँग्रेस नेत्या मा. रजनी पाटील Rajani Patil यांचे मा. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील Chandrakant Patil यांनी अभिनंदनही केले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com