Pune Crime News: पुण्यात मांडलाय नशेचा बाजार, १ कोटींचे अंमली पदार्थ पकडले

Pune Police: गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये अंमली पदार्थांची तस्करी (narcotics) होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam Tv
Published On

अक्षय बडवे, पुणे

Pune News: पुणे पोलिसांच्या (Pune Police) अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल १ कोटींपेक्षा जास्त किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी 32 वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातल्या उच्चभ्रू भागात ही कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील तरुण व्यसनांच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये अंमली पदार्थांची तस्करी (narcotics) होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत.

Pune Crime News
NCP Ex Minister On Sambhaji Bhide: '...अन्यथा मी संभाजी भिडेंचा खून करेल', माजी मंत्र्याचा इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील उच्चभ्रू भागातून तब्बल १ कोटी रुपयांचे अफिम जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शहरातील लोहगाव भागात ही कारवाई केली आहे. राजस्थानच्या ३२ वर्षीय व्यक्तीकडून पोलिसांनी तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचे अफिम हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. राहुलकुमार भुरालालजी साहु असे अटक करण्यात आलेल्या अरोपीचे नाव आहे.

Pune Crime News
Solapur News: सोलापुरात भिडेंच्या समर्थानात मोर्चा, पोलिसांनी केला लाठीमार

एक व्यक्ती लोहगाव भागात असलेल्या पोरवाल रोड येथे एका सोसायटी समोर आला असून त्याच्याकडे अंमली पदार्थ आहे अशी माहिती गस्तीवर असलेल्या पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि त्याची तपासणी केली. तर पोलिसांना त्याच्याजवळ ५ किलो ५१९ किलोग्रॅम वजनाचे अफिम हा अंमली पदार्थ आढळून आला.

त्यानंतर पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने या तरुणाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. हा अंमली पदार्थ या तरुणाने कोणाच्या सांगण्यावरुन पुण्यात आणला होता याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान, लोहगाव हा भाग पुण्यातील एक उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जातो. अनेक प्रसिद्ध आणि नामांकित महाविद्यालय या भागात आहेत.

Pune Crime News
Pune Terrorist News : पुण्यातून अटक केलेले दहशतवादी बाईक चोरायचे, बॉम्बस्फोट नाहीतर... चौकशीत धक्कादायक कारण आलं समोर

दरम्यान, ३० जुलै रोजी देखील पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अशीच कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान, ६० लाख रुपयांचे अफू जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी २४ वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी अटक करण्यात आली होती. पुण्यातील हडपसर परिसरात ही कारवाई करण्यात आली होती. मोहनलाल मेगाराम बिष्णोई असे या अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो राजस्थान येथून पुण्यात अफू विकण्यासाठी आला होता. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com